Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनहेल्दी सोडा, सकाळच्या नाश्त्यात एनर्जीने भरलेल्या ‘या’ पदार्थांचा समावेश करा

सकाळचा नाश्ता कधीही करणे टाळू नये, सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर एनर्जी देत असतो. मात्र नाश्त्यात कोणत्याही पदार्थांचा समावेश न करता पोषक घटकांनी समृद्ध संतुलित आहाराचा समावेश करायला हवा. कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2024 | 04:11 PM
अनहेल्दी सोडा, सकाळच्या नाश्त्यात एनर्जीने भरलेल्या ‘या’ पदार्थांचा समावेश करा
Follow Us
Close
Follow Us:

आजकालच्या धावपळीच्या दुनियेत सर्वचजण फार व्यस्त असतात. अनेकदा यामुळेच लोकांचे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होते. अनेकदा तज्ज्ञांद्वारे संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या आहारात प्रोटिन्स, कर्बोदके आणि पोषकतत्वांचे मुलबक प्रमाण असणे गरजचे असते, ही पोषकतत्वे आपल्याला दिवसभर ऍक्टिव्ह ठेवण्यास मदत करतात.

सकाळचा नाश्ता तर नेहमीच हेल्दी असायला हवा कारण यानंतर आपला संपूर्ण दिवस कामात जात असतो. सकाळच्या नाश्त्याला सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. सकाळचा नाश्ता करणे कधीही टाळू नये, कारण यामुळे आपल्या शरीरात दिवसभर ‘एनर्जी’ राहते आणि आपल्याला थकवाही जाणवत नाही. सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक खावे म्हणजे नक्की काय खावे, असा प्रश्न अनेकांना पडत असतो म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी नाश्त्याच्या पदार्थांची लिस्ट घेऊन आलो आहोत. हे एनर्जीने भरलेले पदार्थ तुम्हाला दिवसभर ऍक्टिव्ह ठेवण्यास मदत करतील.

[read_also content=”जेवणाची चव वाढवतील मशरूमचे हे 5 पदार्थ, वाचा रेसिपीज https://www.navarashtra.com/lifestyle/these-5-mushroom-dishes-will-enhance-the-taste-of-food-read-the-recipes-537724.html”]

ओट्स
नाश्त्याच्या पदार्थांमध्ये तुम्ही ओट्सचे नाव नक्कीच ऐकले असावे. ओट्समध्ये अनेक पोषकतत्वे आढळली जातात. हा एक पौष्टिक नाश्ता मानला जातो, यात व्हिटॅमिन बी, लोह, जस्त, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर हे घटक सामावलेले असतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेकारक ठरतात. बऱ्याचदा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याचे सेवन केले जाते. ओट्स तुम्ही दुधात मध घालून त्यात मिक्स करून खाऊ शकता. अथवा यापासून इतरही प्रकार बनवले जाऊ शकतात जसे की इडली, उपमा.

उकडलेली अंडी
अंडी ही प्रोटीन्सचा एक चांगला स्रोत आहेत. यात भरपूर प्रथिने असतात जे दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. बरेचजण डाएटमध्ये उकडलेल्या अंड्यांचा समावेश करतात. याला बनवायला जास्त वेळही लागत नाही. सकाळच्या नाश्त्यात याचा समावेश जरूर करा.

दूध आणि ब्राउन ब्रेड
मोठयांद्वारे अनेकदा दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधात अनेक पोषक घटक असतात, जी हाडे मजबूत करण्यास मदत करतात. जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम, झिंक, फायबर यांसारखी अनेक खनिजे असतात. या दोघांचे कॉम्बिनेशन सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट आहे.

उपमा / पोहे / इडली
आपल्या भारतीयांच्या नाश्त्यात उपमा, इडली, पोहे या पदार्थांचा समावेश पाहायला मिळतो. अनेकांच्या घरात हे पदार्थ सकाळच्या नाश्त्यात बनवले जातात. हे पदार्थही आपल्या आरोग्यसाठी फायद्याचे आहेत. याच्या सेवनाने शरीराला पोषक घटकही मिळतात आणि एनर्जीदेखील मिळते.

उकडलेली कडधान्ये
अनेकदा बऱ्याच जणांना उकडलेली कडधान्ये खायला आवडत नाहीत. मात्र यात असलेले फायबरचे प्रमाण तुम्हाला दिवसभर एनर्जी देण्यास मदत करते. यात प्रथिने आणि जीवनसत्त्वांसारखे पोषक घटकही आढळतात.

Web Title: Skip the unhealthy include these energy packed foods in your morning breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2024 | 04:11 PM

Topics:  

  • Breakfast Dishes

संबंधित बातम्या

रविवार होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा Cheese Potato Toast Sandwich, लहान मुलांसह मोठ्यांनीही आवडेल
1

रविवार होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा Cheese Potato Toast Sandwich, लहान मुलांसह मोठ्यांनीही आवडेल

चवीबरोबरच पौष्टिकताही… हेल्दी इंडियन ब्रेकफास्ट पर्याय
2

चवीबरोबरच पौष्टिकताही… हेल्दी इंडियन ब्रेकफास्ट पर्याय

झटपट आणि पौष्टिक अंडा पराठा रेसिपी, प्रोटीनने भरलेला सकाळचा नाश्ता
3

झटपट आणि पौष्टिक अंडा पराठा रेसिपी, प्रोटीनने भरलेला सकाळचा नाश्ता

सकाळच्या नाश्त्याला बनवा ज्वारीच्या पिठाची आंबोळी; अवघ्या १० मिनिटांतच तयार होईल रेसिपी
4

सकाळच्या नाश्त्याला बनवा ज्वारीच्या पिठाची आंबोळी; अवघ्या १० मिनिटांतच तयार होईल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.