हिवाळ्यात मुलांमध्ये झोपेची समस्या का वाढते
हिवाळ्यात तापमानात अचानक घट झाल्याने उष्णतेपासून आराम मिळतोच पण मुलांमध्ये झोपेच्या समस्याही वाढतात. हिवाळ्यातील थंडी आणि सूर्यप्रकाशाची कमतरता हे शरीराच्या सर्कॅडियन लयीमध्ये अडथळा निर्माण करतात जी अनेक शारीरिक कार्ये नियंत्रित ठेवतात. थंड तापमान आणि कोरडी हवा श्वसनाच्या कार्यावर परिणाम करते विशेषत: रात्रीच्या वेळी ही समस्या उद्भवल्याने झोपेत अस्वस्थता आणि अडथळा निर्माण होतो.
बऱ्याच मुलांना हिवाळ्यात रात्रीच्या वेळी पुरेसा उबदारपणा मिळविण्यासाठी मुलांना संघर्ष करावा लागतो. हवामानाशी संबंधित कोरड्या त्वचेच्या समस्यांमुळे खाज सुटणे, चिडचिड होणे आणि त्वचेला सूज येणे अशा समस्या आढळून येतात ज्याला हिवाळ्यातील त्वचारोग देखील म्हणतात. डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता, वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ,अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रेन, पुणे यांनी या थंडीत रात्रीच्या वेळी तुमच्या मुलांच्या चांगली आणि शांत झोपेसाठी या आहेत खास टिप्स दिल्या आहेत (फोटो सौजन्य – iStock)
झोपण्यासाठी खास टिप्स
मुलांनी वेळेवर झोपण्यासाठी खास टिप्स
या व्यतिरिक्त काही समस्या असतील तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास संकोच बाळगू नका.
बाळाला लवकर झोपण्यासाठी काय करावे?
लवकर झोपण्यासाठी काय उपाय करावे
तुमच्या बाळाला झोपायला लावण्यासाठी अंगाई
मुलांना झोपण्यापूर्वी मजेदार कथा किंवा अंगाई ऐकायला आवडतात. झोपण्यापूर्वी मुलाला एक अंगाई, कथा किंवा गाणे वाचून वा म्हणून दाखवा. यापैकी कोणती गोष्ट मुलाला चांगली झोपायला मदत करते हे तुमच्या लक्षात येईल. दुसऱ्या दिवसापासून फक्त त्याच गोष्टीचे अनुसरण करा आणि झोपायला जा. जेणेकरून मुल बराच वेळ झोपू शकेल.
दूध पाजून झोपा
मुलांनी झोपण्यापूर्वी दूध पिणे अत्यंत आवश्यक आहे
लहान मुले भूक लागल्यावर बहुतेक रात्री उठतात. जर तुम्ही त्यांना झोपण्यापूर्वी दूध पाजले तर मुल रात्री जागे होण्याची शक्यता कमी होते. बाळाला किंवा अगदी 12-13 वर्षापर्यंत मुलांना जास्त वेळ झोपविण्यासाठी ही खास टीप आहे.
झोपण्यापूर्वी बाथरूम
जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या मध्यरात्री जाग आल्याबद्दल काळजी वाटत असेल, तर त्याला झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये जा. मुले अनेकदा लघवी करण्यासाठी रात्री उठतात. त्यामुळे त्यांची गाढ झोप भंग पावते आणि पुन्हा झोपायला त्रास होतो. अशा स्थितीत मुलाला झोपण्यापूर्वी एकदा लघवी करायला लावा. जेणेकरून रात्री त्याला त्रास होणार नाही.