Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिजवलेले बदाम की अक्रोड, तुमच्या Brain Health साठी काय आहे फायदेशीर?

बदाम आणि अक्रोड दोन्ही आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर मानले जाते, पण जेव्हा स्मरणशक्तीचा विचार केला जातो तेव्हा कोणता ड्रायफ्रूट जास्त प्रभावी आहे? चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 23, 2025 | 09:09 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या धावपळीच्या जीवनात, प्रत्येकालाच स्वतःला निरोगी आणि उर्जेने परिपूर्ण ठेवायचे आहे. यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. अशावेळी अनेक जण ड्राय फ्रुट्सचे सेवन करत असतात. ड्राय फ्रुट्स आपल्या मेंदूला चालना देतात.

मेंदू हा केवळ आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग नाही तर तो आपल्या विचार करण्याची, समजून घेण्याची आणि काम करण्याची क्षमता देखील नियंत्रित करतो. अशा परिस्थितीत, त्याला योग्य पोषण मिळणे महत्वाचे आहे. बदाम आणि अक्रोड दोन्ही मेंदूसाठी खूप फायदेशीर आहेत, पण जेव्हा स्मरणशक्तीचा विचार केला जातो तेव्हा कोणता ड्रायफ्रूट जास्त प्रभावी आहे? अक्रोड की बदाम. चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.

जन्मजात हृदय असतं बाहेर! काय आहे Ectopia Cordis? हार्टची अनोखी रचना; जाणून घेऊया संपूर्ण माहिती

काय आहे जास्त पौष्टिक?

अक्रोड आणि बदाम दोन्हीही निरोगी प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात. दोन्ही ड्राय फ्रुट भिजवल्यानंतर खाऊ शकता. अक्रोडमध्ये फॅटी अ‍ॅसिड 3 मोठ्या प्रमाणात असते, जे मेंदूसाठी चांगले असते. बदामांमध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते, जे स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यात मदत करते. मात्र, अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल असतात, जे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

अक्रोड बदामापेक्षा चांगले कसे आहेत?

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ओमेगा-3 मेंदूची स्मरणशक्ती, कार्यक्षमता वाढवते. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने, ते जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. तसेच चांगल्या पचनसंस्थेला आधार देते. मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने, ते कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, त्यामुळे हृदय निरोगी राहते.

बदाम मेंदूसाठी चांगले का असतात?

बदामांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूसाठी खूप चांगले असते. बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम मेंदूच्या आत माहितीचा योग्य प्रवाह होण्यास मदत करतेच, परंतु स्मरणशक्ती आणि मेंदूची एकाग्रता सुधारण्यासाठी देखील ते उत्कृष्ट मानले जाते. बदामांमध्ये प्रोटीन, फायबर, रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन B12) आणि एल-कार्निटाइन सारखे घटक असतात, जे केवळ दीर्घकाळ एनर्जी प्रदान करत नाहीत तर मेंदूची क्रिया वाढविण्यास देखील मदत करतात.

‘कलेजी खाण्याच्या नादात त्याने काळीज फाडून खाल्ले…” कोकणातील ‘ती’ रात्र आणि चकवा

शेवटी, आपण काय खावे, बदाम की अक्रोड?

अक्रोड आणि बदाम दोन्ही मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, अँटिऑक्सिडंट पातळी आणि पॉलीफेनॉल भरपूर प्रमाणात असतात, जे मेंदूचे कार्य वाढवतात आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात. परंतु, जेव्हा दोन्ही ड्राय फ्रुट्सचा आहारात समावेश केला जातो तेव्हा शरीराला पोषक तत्वांचा मिश्रित डोस मिळतो. अशावेळी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Web Title: Soaked almonds or walnuts which is better for your brain health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 09:09 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • Soaked Almonds
  • Walnuts

संबंधित बातम्या

Motivational Quotes: अपयशाने खचलेल्या लोकांना मिळेल आत्मविश्वासचे बळ, ‘हे’ मोटिव्हेशनल कोट्स नक्की वाचा
1

Motivational Quotes: अपयशाने खचलेल्या लोकांना मिळेल आत्मविश्वासचे बळ, ‘हे’ मोटिव्हेशनल कोट्स नक्की वाचा

मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये ऑटिझमचे प्रमाण कमी का? जाणून घ्या ‘फीमेल प्रोटेक्टिव्ह इफेक्ट’ आणि जनुकीय गुपित
2

मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये ऑटिझमचे प्रमाण कमी का? जाणून घ्या ‘फीमेल प्रोटेक्टिव्ह इफेक्ट’ आणि जनुकीय गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.