(फोटो सौजन्य: Instagram
हृदयासंबंधित अनेक आजारांविषयी तुम्ही ऐकले असेल मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका आजाराची माहिती सांगत आहोत ज्याची कल्पना फार कमी लोकांना आहे. हा आजार म्हणजे एक्टोपिया कॉर्डिस! हा एक दुर्मिळ आणि गंभीर जन्मजात दोष आहे ज्यात नवजात बाळाचे हृदय छातीच्या आत न राहता, तर छातीच्या बाहेर किंवा छातीच्या जवळपासच्या भागांमध्ये बाहेर येऊन वाढलेलं असतं.
सध्या, एक्टोपिया कॉर्डिस कशामुळे होतो याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाही. तथापि गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात छातीच्या भिंतीच्या अयोग्य विकासामुळे असे घडून आल्याचे सांगितले जाते. हा दोष 100,000 जन्मांपैकी 1 एकाला उद्भवतो आणि बहुतेकदा छाती, पोट किंवा हृदयात इतर विकृतींसह येते. यात तात्काळ शस्त्रक्रियेशिवाय जगण्याची शक्यता फार कमी असते आणि उपचार घेऊनही, दीर्घकालीन परिणाम तीव्रता आणि संबंधित दोषांवर अवलंबून असतात. मानवी विकास किती गुंतागुंतीचा आणि नाजूक असू शकतो याचे हे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. चला याविषयी थोडी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जन्मजात दोष:
एक्टोपिया कॉर्डिस हा एक जन्मजात दोष आहे, ज्यात बाळ जन्माला येतानाच या अवस्थेत असतं
हृदयाची स्थिती:
यामध्ये, हृदयाचा काही भाग किंवा संपूर्ण हृदय छातीच्या बाहेर किंवा छातीजवळच्या त्वचेखाली दिसू शकतं
इतर हृदयविकार:
एक्टोपिया कॉर्डिस अनेकदा इतर हृदयविकारांशी संबंधित असतो, जसे की हृदयाची रचना योग्य प्रकारे तयार न होणे, किंवा हृदयाच्या स्नायूंची समस्या
उपचार:
या अवस्थेचा उपचार शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय उपायांमधून केला जाऊ शकतो
View this post on Instagram
A post shared by BioDynamics__ | Medical | Disorders | Disease (@biodynamics__)
विवाहित पुरुषांना दुसऱ्याची बायकोच का आवडते? काय आहे यामागचं मूळ कारण? जाणून घ्या
नवजात बाळाच्या जन्मानंतर लगेचच हा आजार ओळखता येतो कारण यात बाळाचे हृदय छातीच्या पोकळीच्या आत नसून बाहेर असते. याशिवाय, काही इतर लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात, जसे की-
लक्षात ठेवा की एक्टोपिया कॉर्डिस ही एक जन्मजात समस्या आहे जी नवजात मुलांमध्ये आढळून येते. या समस्येबद्दल घाबरून न जाता, योग्य काळजी आणि उपचारांनी या आजराला बरे केले जाऊ शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.