Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिकता जपणारी नागार्जुनाची विहीण, Sobhita च्या आईच्या सिल्क साड्या पाहून म्हणाल ‘क्लासिक’

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाने 4 डिसेंबर रोजी हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये लग्न केले. त्यांचे लग्न तेलुगू रितीरिवाजांनुसार पार पडले, ज्यामध्ये वधू शोभिता धुलिपालाच्या आईने लक्ष वेधले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 12, 2024 | 11:28 AM
सोभिताच्या आईच्या दाक्षिणात्य लुकने वेधले सर्वांचे लक्ष, साधेपणाने जिंकले मन

सोभिताच्या आईच्या दाक्षिणात्य लुकने वेधले सर्वांचे लक्ष, साधेपणाने जिंकले मन

Follow Us
Close
Follow Us:

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला दोघांनी मोठ्या थाटामाटात 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये तेलगू रितीरिवाजांनुसार लग्न केले. या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यांच्या लग्नाच्या दिवशी, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला पूर्णपणे पारंपारिक दक्षिण भारतीय वधू आणि वराप्रमाणे कपडे परिधान करून आले होते, ज्याचा सगळीकडे बोलबाला झाला.  लग्नात शोभिताने सोनेरी रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली होती, तर नागाने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पारंपरिक वेषात दिसून आला

मात्र, या लग्नाला येणारे पाहुण्यांचा लुकही कुठेच कमी पडला नाही. त्यांनीदेखील पारंपरिक कपड्यांसह ग्लॅमरचा पूर्ण तडका दिला होता. मात्र या सगळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे नागार्जुनची विहीण असणाऱ्या कामाक्षीने. शोभिता धुलिपालाच्या आईने संपूर्ण लग्नात अतिशय साधा लुक ठेवला होता, मात्र पारंपरिकता जपत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वधूची आई असूनही, तिने चमकदार रंगाची साडी नेसली नाही किंवा तिच्या चेहऱ्यावर जास्त मेकअप केला नाही, पहा सोभिताच्या आईचा क्लासिक पारंपरिक सिल्क साडीतील लुक (फोटो सौजन्य – Instagram) 

दाक्षिणात्य सोन्याचे दागिने 

सोभिताच्या आईचा क्लासी लुक

शोभिता धुलीपालाच्या आईचा लुक अत्यंत साधा असला तरीही तिने या सुंदर साडीसोबत सोन्याचे दागिने घातले होते, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. खरं तर, फार कमी लोकांना माहीत असेल की दक्षिण भारतात सोन्याचे दागिने घालण्याचा ट्रेंड आहे. तेथील महिला फॅशन ज्वेलरीला जास्त पसंती देत ​​नाहीत. शोभिताची आईही काही वेगळी नव्हती. तिने तिच्या गळ्यात नेकपीस असलेला लटकन सेट घातला होता आणि तिच्या दोन्ही हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. तर संपूर्ण विधीमध्ये तिने सोन्याचे खरे दागिने घालण्यालाच पसंती दिली होती, ज्यामुळे तिचा लुक अधिक रॉयल दिसून आला. 

Viral: सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यच्या लग्नाचे First Pics, गोल्डन कांजीवरममध्ये नटली दाक्षिणात्य नवरी

पारंपरिक साड्या केल्या परिधान 

दाक्षिणात्य पद्धतीच्या साड्यांना दिले प्राधान्य

शोभिता धुलिपालाने तिच्या पासुपू कोट्टाडम समारंभात तिच्या सासू लक्ष्मी विजयराघवनच्या फॅशन लेबल लक्ष्मी द फाइनलाइन कलेक्शनची केशरी आणि हिरव्या काठाची साडी नेसली होती, तर तिच्या आईने स्वतःसाठी मिंट हिरवी आणि त्यावर जांभळ्या रंगाची बॉर्डर असणारी साडी नेसली होती, जी पूर्णपणे रेशमी कपड्याने परिपूर्ण असल्याचे दिसून येत होते 

या साडीत कोणत्याही प्रकारचे हेव्ही वर्क करण्यात आले नव्हते पण दाक्षिणात्य सिग्नेचर वर्क त्याच्या बॉर्डर लाईनमध्ये होते. मात्र, साडीचा कलर कॉन्ट्रास्ट असून खूपच सुंदर होता ज्यामुळे त्याला रिगल आणि रॉयल टच मिळत होता. 

शोभिताच्या फॅशनची नेटकऱ्यांना भूरळ, वेस्टर्न आऊटफिटने चाहत्यांचे वेधलं लक्ष

मंगलस्नानातही वेधून घेतले लक्ष 

शोभिता धुलिपालाने तिच्या हळदीसाठी पिवळ्या रंगाची कॉटन साडी नेसली होती, ज्यामध्ये तिने ऑफ शोल्डर पॅटर्नचा ब्लाउज घातला होता, तर तिच्या आईनेही स्वतःसाठी लाल काठाची पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. ही साडी अतिशय हलकी असून संपूर्ण दाक्षिणात्य टच होता. साडीवर कोणत्याही प्रकारची एम्ब्रॉयडरी नव्हती, तर या साडीसह सोभिताच्या आईने सिल्कचा ब्लाउज मॅच केला होता, ज्यावर बुटी प्रिंटचे काम करण्यात आले होते. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात मंगळसूत्र आणि सोन्याचा सेट घातला होता.

Web Title: Sobhita dhulipala mother santha kamakshi looks beautiful and gorgeous in traditional silk sarees unseen photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • fashion tips
  • Naga Chaitanya
  • Sobhita Dhulipala

संबंधित बातम्या

फॅशन जगाच्या इतिहासात ‘या’ अभिनेत्रींनी वाढवला भारताचा अभिमान, कान्सपासून ते मेट गालामध्ये केलेल्या लुकची होती मोठी चर्चा
1

फॅशन जगाच्या इतिहासात ‘या’ अभिनेत्रींनी वाढवला भारताचा अभिमान, कान्सपासून ते मेट गालामध्ये केलेल्या लुकची होती मोठी चर्चा

२०२५ मध्ये ‘या’ अभिनेत्रींच्या ब्रायडल लुकची सोशल मीडियावर होतील मोठी चर्चा, मिनिमल आणि आकर्षक लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष
2

२०२५ मध्ये ‘या’ अभिनेत्रींच्या ब्रायडल लुकची सोशल मीडियावर होतील मोठी चर्चा, मिनिमल आणि आकर्षक लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष

Tejaswini Lonari चा हिरव्याकंच साडीमधील लुक, लग्नानंतर नववधूचा Glow दिसतोय कमालीचा आकर्षक
3

Tejaswini Lonari चा हिरव्याकंच साडीमधील लुक, लग्नानंतर नववधूचा Glow दिसतोय कमालीचा आकर्षक

लग्नापासून ते ऑफिसपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात हातांमध्ये शोभून दिसतील १ ग्रॅम सोन्याचे लेटेस्ट फॅशन सुंदर गोठ, पहा डिझाईन
4

लग्नापासून ते ऑफिसपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात हातांमध्ये शोभून दिसतील १ ग्रॅम सोन्याचे लेटेस्ट फॅशन सुंदर गोठ, पहा डिझाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.