अभिनेत्री शोभिता धुलिपाला सध्या फार चर्चेत आहे. या चर्चेस कारण कि येत्या डिसेंबर महिन्यात शोभिता लग्नबंधनात अडकणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा अभिनेता नागा चैतन्या आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाह ४ डिसेंबर रोजी आयोजित केले गेले आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक नवा फोटोशूट शेअर केला आहे. तसेच त्यांच्या लग्नाचे फोटोज पाहण्यासाठी चाहते आतुरले आहेत.
अभिनेत्री शोभिता धुलिपालाने शेअर केला नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)
दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धुलिपालाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवर सुंदर फोटोज शेअर केले आहेत. फोटोजमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
मुळात, प्रत्येक फोटोंमध्ये अभिनेत्रीचा नवा लुक पाहायला मिळत आहे. प्रत्येक छायाचित्रातील तिचा नवा अवतार आकर्षणाचा मुख्य केंद्र ठरला आहे.
जरी प्रत्येक फोटोमध्ये नवा लुक दिसून येत असला तरी प्रत्येक फोटोंमध्ये डोळ्यांतील चमक मात्र कायम आहे. तो रुबाबदार चेहरा सुंदरतेचा प्रतीक आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टग्राम हॅन्डलवर हा फोटोशूट शेअर केला असून, पोस्टखाली छानसा कॅप्शन दिला आहे. या कॅप्शनच्या माध्यमातून त्यांनी @lovebirds.studio या फॅशन ब्रँडची जाहिरात केली आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये अभिनेत्रींच्या चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे फार कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी तिच्या आऊटफिट्चे जबरदस्त कौतुक केले आहे.