आंबट गोड चवीचे लिंबू पाणी आरोग्यासाठी ठरेल विषारी
वर्षाच्या बाराही महिने लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, शरीर डिटॉक्स करण्यासाठी किंवा त्वचा कायमच टवटवीत ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी राहते. याशिवाय पोटावर किंवा शरीराच्या इतर अवयवांवर वाढलेला अनावश्यक चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायले जाते. अशा पद्धतीने लिंबू पाण्याचे सेवन केल्यास झपाट्याने वजन कमी होईल. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि सायट्रिक ऍसिड आढळून येते. ज्यामुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग किंवा पिंपल्स कमी होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
सावधान! ‘या’ पद्धतीने दही खाल्ल्यास आतड्यांमध्ये बसेल पीळ, जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ
लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी जितके चांगले आहे, तितकेच वाईट सुद्धा आहे. लिंबू पाणी प्यायल्यानंतर काहींच्या आरोग्याला हानी पोहचते. तसेच जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीरात विषासमान पदार्थ तयार होतात. म्हणूनच आज आम्ही लिंबू पाणी प्यायल्यानंतर शरीरात जर ही गंभीर लक्षणे दिसत असतील तर लिंबू पाण्याचे अजिबात सेवन करू नये. यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी शरीराचे नुकसान होईल आणि शरीरात थकवा जाणवू लागेल.
लिंबू पाणी प्यायल्यानंतर जर तुमचे दात कमकुवत किंवा आंबट झाले असतील तर लिंबू पाण्याचे सेवन करणे टाळावे. यामुळे तुमच्या दातांचा रंग सुद्धा बदलू लागतो. लिंबूमध्ये तीव्र आम्लता असते, ज्यामुळे दातांचे इनॅमल खराब होऊन जातात. यामुळे दातांमध्ये पोकळी तयार होणे, वेदना होऊ लागतात.
छातीत वारंवार जळजळ आणि आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर अजिबात लिंबू पाण्याचे सेवन करू नये. यामुळे छातीमध्ये आणखीनच जळजळ वाढते आणि पचनक्रियेवर परिणाम दिसून येतात. याशिवाय पोट आणि अन्ननलिकेचे नुकसान होते. लिंबू पाण्याचे सेवन केल्यानंतर तुम्हाला छातीत जळजळ, गॅस आणि पोटफुगीची त्रास होऊ शकतो.
ज्या महिलांची त्वचा अतिसंवेदनशील आहे, अशांनी अजिबात लिंबू पाण्याचे सेवन करू नये. लिंबू पाण्याचे जास्त सेवन केल्यामुळे त्वचा रुक्ष किंवा कोरडी होऊ शकते. लिंबूमध्ये असलेले आम्ल त्वचेवरील ओलावा नष्ट करून टाकतात. त्यामुळे जास्त लिंबू पाणी पिऊ नये.
आंबट किंवा लिंबू वर्गीय फळांमध्ये ऍलर्जी युक्त घटक असतात. त्यामुळे काहींना लिंबू पाणी प्यायल्यानंतर रॅश येणे किंवा खाज येऊ लागते. त्वचेवर पुरळ, खाज किंवा सूज इत्यादी समस्या वाढू श्वास घेण्यास त्रास होतो.
लिंबू पाण्यात काय असते?
लिंबू पाण्यात विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक ऍसिड असते.
लिंबू पाणी पिण्याचे काही तोटे आहेत का?
जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्यास ऍसिडिटी किंवा दातांमध्ये संवेदनशीलता येऊ शकते. त्यामुळे, ते कमी प्रमाणात प्यावे.
लिंबू पाणी किती दिवस प्यावे?
तुम्ही लिंबू पाणी रोज पिऊ शकता. पण, तुमच्या शरीराची प्रतिक्रिया पाहून त्याचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.