'या' पद्धतीने दही खाल्ल्यास आतड्यांमध्ये बसेल पीळ, जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही आणि इतर थंड पदार्थांचे सेवन केले जाते. रोजच्या आहारात दही खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी किंवा पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी दही किंवा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. दही खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करते. मात्र बऱ्याचदा दही चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ले जाते. चुकीच्या पद्धतीने दही खाल्ल्यास आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी दह्याचे सेवन करावे आणि कधी करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. कोणत्याही वेळी दही खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतील.(फोटो सौजन्य – istock)
सर्दीला म्हणा गुडबाय! गरम पाण्याची वाफ घेताना पाण्यात टाका ‘हे’ बारीक दाणे, छातीतील कफ होईल मोकळा
आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी दही खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. कारण दही अतिशय थंड आणि जाड असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी दही पचन होण्यास जास्तीचा वेळ लागतो. पचनक्रिया मंदावल्यामुळे दही सहज पचन होत नाही.दही व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अजीर्ण, गॅस, ऍसिडिटी आणि ब्लोटिंग इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्याशिवाय रात्रीच्या वेळी दही खाल्यामुळे सायनस, सर्दी किंवा श्वसनासंबंधी अॅलर्जी इत्यादी आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री अजिबात दही खाऊ नये.
दही खाल्यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दुपारच्या वेळी थोडस दही खाल्यास शरीर कायमच हेल्दी राहील. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड, प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचेवरील नैसगरिक चमक कायमच टिकवून ठेवण्यासाठी दही खावे. नियमित अर्धा वाटी किंवा वाटीभर दही खाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होईल.
दही खाण्याची सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ किंवा दुपार. सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या आहारात दह्याचे सेवन करावे. सकाळी नाश्त्यात दही खाल्यास शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहील आणि संपूर्ण दिवस उत्साहामध्ये जाईल. तसेच दुपारच्या आहारात दही खाल्यास पचनक्रिया मजबूत होते आणि आतड्यांच्या हालचाली सुलभ होतात. तसेच रात्रीच्या वेळी दही खाल्यामुळे पचनक्रियेवर तणाव येतो.
दही म्हणजे काय?
दही हे दुधापासून बनवलेले एक दुग्धजन्य उत्पादन आहे, ज्यामध्ये दुधातील लैक्टोज जीवाणूंच्या मदतीने लॅक्टिक ऍसिडमध्ये रूपांतरित होते. यामुळे दही आंबट आणि दाट होते.
दही आणि योगर्ट मध्ये काय फरक आहे?
दही आणि योगर्ट दोन्ही दुधापासून बनवलेले असले तरी, त्यांची निर्मिती प्रक्रिया आणि वापरल्या जाणार्या जीवाणूंमध्ये फरक असतो. दह्यामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले लॅक्टिक ऍसिड असते, तर योगर्टमध्ये विशिष्ट प्रकारचे जीवाणू (bacteria) वापरले जातात.
दह्यासोबत काय खाऊ नये?
काही पदार्थांसोबत दही खाणे टाळावे कारण त्यामुळे पचनाच्या समस्या येऊ शकतात. उदाहरणार्थ, दही आणि मासे किंवा दही आणि मांस एकत्र खाणे टाळावे.