अनावश्यक चरबी वाढून फुगलेले पोट होईल कमी! उपाशी पोटी नियमित प्या 'हा' खास काढा
पोटावर वाढलेल्या चरबीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. चुकीचा आहार, अपुरी झोप, हवामानातील बदल, जंक फूड इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी वाढू लागते. हात, मांड्या,पोट आणि शरीराच्या इतर अवयवांवर अनावश्यक चरबी वाढू लागते. लठ्ठपणा वाढल्यानंतर डायबिटीस, हृदयरोग आणि कॅन्सर इत्यादी अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. मात्र असे न करता शरीराचे योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेला लठ्ठपणा आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे वजन कमी करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक महागडे डाएट घेतात, तसेच जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम केला जातो. तर अनेक लोक सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचे जेवण करणे टाळतात. पण असे न करता आहारात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या काढ्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या काढ्याचे महिनाभरात नियमित सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो आणि शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होते. वजन कमी करताना घरगुती पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात दोन ग्लास पाणी घेऊन गरम करून घ्या. त्यानंतर किसलेलं आलं, दालचिनी, वेलची, ओवा आणि जिऱ्याची पावडर टाकून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर त्यात बडीशेप टाकून काढा व्यवस्थित उकळवून घ्या. टोपातील पाणी अर्धा झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेले पाणी गाळून घ्या. त्यानंतर त्यात मध टाकून सकाळी उपाशी पोटी नियमित प्या. बडीशेपमध्ये असलेले फायबर शरीरात साचलेली घाण बाहेरकाढून टाकण्यासाठी मदत करते. नियमित या पेयांचे सेवन केल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.
High LDL Cholesterol असल्यास कशी घ्याल काळजी, तज्ज्ञांच्या ‘या’ गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
पातळ मांस, मासे, अंडी, डाळी, आणि शेंगा.फायबर: फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, आणि शेंगा.निरोगी चरबी: अवोकाडो, नट्स, आणि बिया.पाणी: पुरेसे पाणी प्या. टाळा: साखर, प्रक्रिया केलेले अन्न, आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ.
वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यावे?
दररोज 1-2 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.व्यायामाच्या आधी आणि नंतर पाणी प्या.भरपूर पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
साखरयुक्त पेये, मिठाई, आणि प्रक्रिया केलेले पदार्थ.तळलेले पदार्थ, फास्ट फूड, आणि चरबीयुक्त मांस.नियमितपणे आणि वेळेवर जेवणाची सवय ठेवा.