
मकरसंक्रांतीच्या बोरन्हाणासाठी चिमुकल्यांचे खास कलेक्शन!
नवीन वर्षात साजरा केला जाणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. दरवर्षी संक्रांत १४ जानेवारीला तर किंक्रांत १५ जानेवारीला असते. या तारखांमध्ये कधीही बदल होत नाही. मकरसंक्रांतीच्या दिवशी शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्यांचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. याला सुगड पूजन असे सुद्धा म्हंटले जाते. महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवस असतो. संक्रांतीच्या दिवशी सर्वच महिला आवर्जून काळ्या रंगची साडी नेसतात. यादिवशी काळ्या रंगला खूप जास्त महत्व असते. संपूर्ण देशभरात मकर संक्रांतीला सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. तसेच मकर संक्रांत झाल्यानंतर लहान मुलांचे बोरन्हाण सुद्धा केले जाते. यादिवशी मुलांना काळ्या रंगाचे सुंदर कपडे घातले जातात. देशाच्या अनेक गावांमध्ये मकरसंक्रांत सण पारंपरिक आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.(फोटो सौजन्य – Navarashtra)
Makar Sankranti 2025: मकर संक्रांत सण का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील भौगोलिक आख्यायिका
बोरन्हाण म्हणजे मकर संक्रांतीच्या काळात साजरा केला जाणारा एक पारंपरिक सोहळा आहे. यात बाळाला बोरं, ऊस, तिळाच्या रेवड्या आणि इतर गोड पदार्थांनी अंघोळ घातली जाते. हा एक संस्कार असून, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, सौभाग्यासाठी आणि समृद्धीसाठी बोरन्हाण साजरा केले जाते. यादिवशी बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालून त्यावर हलव्याचे सुंदर सुंदर दागिने घातले जातात. त्यानंतर बाळाला पाटावर बसवून त्याचे औक्षण केले जाते.बऱ्याचदा लहान मुलांचे पारंपरिक कपडे सहज उपलब्ध होत नाही.पण ठाण्यातील या दुकानात तुम्हाला लहान मुलांसाठी मकरसंक्रांतीच्या बोरन्हाणासाठी लागणारे सर्व कपडे माफक दारात मिळतील.पहा व्हिडिओ
ठाण्यातील इशा क्रिएशन या दुकानात लहान मुलांच्या बोरन्हाणासाठी लागणारे काळ्या रंगाचे कपडे उपलब्ध आहेत. मुलांसाठी पारंपरिक आणि ट्रेंडी टच असलेले कपडे सहज मिळतील. तसेच त्यांच्याकडे कस्टमायझेशन देखील उपलब्ध आहेत. इशा क्रिएशनची मकरसंक्रात कायमच स्पेशल असते, कारण त्यांच्याकडे बोरन्हाणासाठी मुलांना लागणारे सर्व कपडे मिळतात. त्यांच्याकडे मुलांसाठी कुर्ता पॅन्ट सेट, कुर्ता धोती सेट, ब्रोकेड बनारसी कुर्ता धोती सेट, हॅन्डलूम कुर्ता पॅन्ट सेट तर वेगवेगळ्या पद्धतीने कस्टमायझेशन करून बनवलेले कपडे सुद्धा मिळतात. इशा क्रिएशनमध्ये अगदी जन्मलेल्या बाळापासून ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींचे सर्व प्रकारातील कपडे उपलब्ध आहेत.
मकरसंक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात साडीवर करा आकर्षक हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये दिसाल देखण्या
लहान मुलींसाठी त्यांच्याकडे खणाच्या कापडाचा वापर करून बनवलेले सुंदर फ्रॉक, खणाला पैठणीचा टच देऊन बनवलेले सुंदर फ्रॉक सुद्धा उपलब्ध आहेत. इशा क्रिएशनमधील कपडे सहज वापरता येतील असे आहेत. त्यांच्याकडील कपड्यांवर पतंगाची एम्ब्रॉडरी करून तयार केलेले सुंदर फ्रॉक आणि मुलांचे इतर कपडे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही आई मुलींसाठी सेम ड्रेस सुद्धा बनवून घेऊ शकता.तुम्हाला सुद्धा मकरसंक्रांतीच्या बोरन्हाणासाठी चिमुकल्यांचे खास आणि पारंपरिक टच असलेले सुंदर कपडे हवे असतील तर ठाण्यातील इशा क्रिएशन या दुकानाला नक्की भेट द्या.
इशा क्रिएशन पत्ता: राम मारुती रोड, शिव प्रसाद हॉटेल समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र ४००६०२