मकर संक्रांत सण का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील भौगोलिक आख्यायिका
नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात मकर संक्रांत सण साजरा केला जातो. हा सण शेती संबंधित आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्यांचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. याला सुगड पूजन असे म्हंटले जाते. महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवस असतो. संक्रांतीच्या आधल्या दिवशी भोगी आणि संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. संक्रांतीच्या दिवशी सर्वच महिला आवर्जून काळ्या रंगची साडी नेसतात. यादिवशी काळ्या रंगला खूप जास्त महत्व असते. संपूर्ण देशभरात मकर संक्रांतीला सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया मकर संक्रांत का साजरा केली जाते आणि यामागील भौगोलिक आख्यायिका.(फोटो सौजन्य – pinterest)
हलव्याच्या दागिन्यांनी वाढवा मकरसंक्रांती सणाचा गोडवा! हळदीकुंकू समारंभात सौंदर्य दिसेल खुलून
मकर संक्रांतीची देवता संक्रांती देवींनी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा सवहार करून लोकांचे रक्षण केले होते. त्यानंतर लोकांचे आयुष्य सुखकर झाले. तो दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी देवीने किंक्रांरासुराचा वध केला तो दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. शिवाय भौगोलिक दृष्ट्या होणारा बदल सांगणारी गोष्ट म्हणजे सूर्यदेव आपला पुत्र शनीला भेटण्यासाठी जातात. शनीला भेटण्यासाठी त्यांना मकर राशीत जावे लागते. याला मकरसंक्रांत असे म्हणतात. यालाच काही ठिकणी उत्तरायण असे सुद्धा म्हंटले जाते. कारण या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा होऊ लागतो. सूर्य हा अधिक काळ पृथ्वीवर राहतो.
संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. हिंदू संस्कृतीला मकर संक्रात हा एकमेव सण आहे, ज्याच्या तारखा कधीच बदलत नाहीत. संक्रांतीनंतर रात्र लहान आणि दिवस मोठा असतो. याशिवाय ऋतुबदल होण्यास सुरुवात होते. हवेमधील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होते. तसेच उत्तरायण सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये वातवरणात गारवा असतो आणि नंतर उन्हाळा ऋतूला सुरुवात होते. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये मकर संक्रांत सण वेगवेगळ्या चालीरीतींप्रमाणे साजरा केला जातो.






