नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यादिवशी सुगड पूजन करून महिलांना हळदीकुंकू दिला जातो. याशिवाय सर्वच महिला काळ्या रंगाची सुंदर साडी नेसून छान तयार होतात. काळ्या रंगाच्या साडीवर हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा फार वर्षांपूर्वीची आहे. हलव्याच्या दागिन्यांमुळे लुक मराठमोळा आणि पारंपरिक दिसतो. सुंदर साडी नेसल्यानंतर त्यावर कशा पद्धतीने हेअर स्टाईल करावी, बऱ्याचदा सुचत नाही. घाईगडबीच्या वेळी महिला केस मोकळे सोडून त्यावर मोगऱ्याच्या फुलांचे गजरे लावतात. चला तर पाहुयात साडीवर शोभून दिसतील अशा सुंदर आणि आकर्षक हेअर स्टाईल. (फोटो सौजन्य – pinterest)
मकरसंक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात साडीवर करा आकर्षक हेअर स्टाईल,

काळ्या रंगाची बनारसी साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही मेसी बन हेअर स्टाईल करू शकता. मेसी बन बांधल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या रंगाची फुले किंवा मोगऱ्याचा गजरा अतिशय सुंदर दिसतो.

घरातील घाईगडबडीच्या वेळी साडी नेसल्यानंतर त्यावर कोणती हेअर स्टाईल करावी बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही या पद्धतीमध्ये गजरा लावून हेअर स्टाईल करू शकता.

लांब केस असलेल्या महिला वेणी हेअर स्टाईल करण्यास जास्त प्राधान्य देतात. मोगऱ्याच्या फुलांचा गजरा वापरून या पद्धतीने हेअर स्टाईल केल्यास साऱ्यांच्या नजरा तुमच्यावर जातील.

बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे आणि पॅर्टनचे अंबाडे उपलब्ध आहेत. त्यामुळे ओरिजनल केसांचा छोटा अंबाडा बांधून त्यावर तुम्ही डिझाइनर अंबाडा किंवा सुंदर हेअरस्टाईल केलेली वीक लावू शकता.

अनेकांना केस मोकळे ठेवायला खूप जास्त आवडतात. केस मोकळे ठेवून केसांमध्ये मोगऱ्याचा फुलांचा गजरा माळाल्यास लुक स्टायलिश दिसेल.






