Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टीलच्या ताटापेक्षा या पानात जेवण्याने मिळतील आरोग्याला फायदे, Sri Sri Ravi Shankar यांचा सल्ला

Health Tips By Sri Sri Ravi Shankar: निरोगी असणे म्हणजे भावनिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे. यासाठी पोषण आणि आहार महत्त्वाचा आहे, याविषयी आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी सांगितले आहे. श्री श्री रवि शंकर हे नेहमीच सोशल मीडियावर आरोग्याविषयक जागरूक करत असतात. निरोगी राहण्यासाठी नक्की कसे जेवावे याबाबत घेऊया अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 27, 2024 | 01:00 PM
श्री श्री रवि शंकर यांनी दिल्या आरोग्याबाबत टिप्स

श्री श्री रवि शंकर यांनी दिल्या आरोग्याबाबत टिप्स

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी राहणे म्हणजे केवळ आजारांपासून दूर राहणे नव्हे. त्याऐवजी, हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे जो आपण किती आनंदी, प्रेमळ आणि उत्साही आहात हे प्रतिबिंबित करतो असे श्री श्री रविशंकर यांनी आरोग्यावर आपले मत मांडले आहे. श्री श्री रविशंकर यांनी दीर्घ, निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

मधुमेह, उच्च रक्तदाब, नैराश्य आणि चिंताग्रस्त रुग्ण किंवा अगदी तंदुरुस्त व्यक्ती या टिप्सचे पालन करून आरामदायी आणि आनंदी जीवन जगू शकतात. तसंच तुम्ही अनेक आजारांपासून दूरही राहू शकता. जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – Instagram/iStock) 

प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटची गरज 

एका व्हिडिओमध्ये श्री श्री रविशंकर यांनी आहार आणि पोषणाद्वारे फिटनेस वाढवण्याचे मार्ग सांगितले आहेत. ते म्हणाले की, ‘आपल्या शिक्षण व्यवस्थेत हे शिकवले जाते की नाही माहीत नाही, पण मुलांना पोषणाची माहिती असली पाहिजे. प्रथिने, कार्ब किंवा इतर पोषणाची गरज किंवा कार्य काय आहे हे मुलांना चांगल्या पद्धतीने माहीत करून दिले पाहिजे. आपण काय आणि किती खावे हे त्यांना कळले पाहिजे.

हेदेखील वाचा – अतूट नात्यासाठी श्री श्री रविशंकर यांच्या 5 टिप्स ठरतील योग्य, प्रेमाच्या बंधनात राहाल गुरफटून

सांगितल्या आजीच्या टिप्स 

संपूर्ण आहार महत्त्वाचा

श्री श्री रविशंकर यांनी सांगितले की त्यांची आजी जेवणात नेहमी पालक बनवायची. तर आहारात नियमित वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेशही करण्यात येत होता. एकादशीचे व्रत करण्यापासून ते अगदी तिखट चवीची पाने, कारले आणि अनेक आरोग्यदायी भाज्या त्यांनी आजीमुळे लहानपणापासून खाल्ल्या आहेत. त्यांच्या आजीच्या आहारात दही, कोशिंबीर आणि डाळ यांचा नियमित समावेश होता, ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास अधिक मदत झाली. 

केळ्याच्या पानाचे महत्त्व 

अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केळीच्या पानांवर खाण्याचे फायदेदेखील यामध्ये सांगितले आहेत. ही सवय दृष्टीसाठी चांगली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केळीच्या पानावर जेवण वाढण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये उजव्या हाताला वरच्या बाजूला मीठ ठेवले जाते आणि त्याखाली कोशिंबीर आणि हंगामातील आरोग्याला पोषक ठरणाऱ्या भाज्या वाढल्या जातात. संपूर्ण जेवणामध्ये 12-13 खाद्यपदार्थांचे लहान लहान भाग असतात, जे संपूर्ण संतुलित आहार बनवतात. 

हेदेखील वाचा – इंटरमिटेंट फास्टिंग की किटो डाएट, Weight Loss साठी काय करावे फॉलो

केळ्याच्या पानावर जेवणाचे फायदे 

केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यदायी फायदे

केळ्याच्या पानावर जेवल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यामध्ये कॅल्शियम, विटामिन ए, सी आणि टॅनिनचा भरणा असतो. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून ताप, सर्दी खोकल्यापासून दूर राहता येते. तसंच अनेक आजारांपासून दूर राहू शकता. याशिवाय रक्तदाबाचा त्रासही कमी होतो.  केळीच्या पानांवर खाल्ल्यामुळे त्यातील पदार्थांमध्ये पॉलीफेनॉल मिसळून पौष्टिक मूल्य वाढते आणि शरीराला फायदा मिळतो.

कसे असावे डाएट

डाएटमध्ये नेमके काय असावे

श्री श्री रविशंकर यांच्या मते, तुम्ही योग्य प्रमाणात योग्य अन्न खावे ज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. शाकाहारी, पौष्टिक आणि पचायला हलका असा आहार घ्यावा. शुद्ध मध, आले, बदाम, बिया आणि ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन तुम्ही आहारात करत आहात की नाही याबाबत खात्री करून घ्या

Web Title: Sri sri ravi shankar explained benefits of eating on banana leaf diet tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 01:00 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी
1

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे
2

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे

वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं ‘हिप डिस्प्लेसिया’चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या
3

वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं ‘हिप डिस्प्लेसिया’चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या

Colorectal Cancer Awareness Month: पचनाच्या तक्रारी वारंवार होतात? सावधान! असू शकतात कॅन्सरचे संकेत
4

Colorectal Cancer Awareness Month: पचनाच्या तक्रारी वारंवार होतात? सावधान! असू शकतात कॅन्सरचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.