
फोटो सौजन्य - Social Media
ट्रेन म्हणजे काय? तर भारतीयांची जीवनवाहिनी! पण एक गोष्ट मात्र खरं! भारतीयांना भांडायला खूप आवडतं. (Rainagar Railway Station) भांड्याला भांडा लागल्याशिवाय इथे कुणाचा दिवस जात नाही. आता तसेच काही पश्चिम बंगालमध्ये स्थित असलेल्या या रेल्वे स्थानकाचे झाले आहे. दशके उलटून गेली पण या रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर काळ्या अक्षरांची जाड पट्टी काही उमटली नाही. का? याला कारणही तसेच आहे. “भांडण!” (Railway Station Without Name)
या कारणामुळे रेल्वे स्थानकाला नाव नाही
भारतात वाद ठिकठिकाणी आहे. गुण्यागोविंदाने राहणे येथे लोकांना जमते खरं पण वादाशिवाय दिवस कसा जाणार? काही दशकांपूर्वी असाच एक वाद रंगला होता. तोही दोन गावांमध्ये! या रेल्वे स्थानकाच्या परिसरात दोन गावे येतात. एकाचे नाव आहे ‘रैना’ तर दुसऱ्या गावाचं नाव ‘रैनागर’! पण या रेल्वे स्थानकाला नाव मात्र कोणतं द्यावं? या प्रश्नाने स्थानिक प्रशासनाचीच दमछाक उडाली. कारण रैना नाव दिले तर रैनागर गावाचे गावकरी रुसून त्यागा करतील आणि रैनागर नाव दिले तर रैना गावाचे नागरिक भडकून उठतील. तर आता करावे तरी काय? त्यामुळे या रेल्वे स्थानकाला बेनामच ठेवले आहे. या रेल्वे स्थानकाला नावच नाही. (Railway Station With No Name)
नाव नसले तरी आजूबाजूच्या गावच्या गावकऱ्यांसाठी आणि त्यांच्या उपजीविकेसाठी हा रेल्वे स्थानक फार महत्वाचा आहे. कारण येथील जवळचे शहर या रेलवे स्थानकापासून फार काही दूर नाही. अगदी ३५ किलोमीटर अंतरावर शहर असून गावच्या गावकऱ्यांची बहुतेक कामे तिथेच आहेत त्यामुळे या बेनाम रेल्वे स्थानकामुळे त्यांच्या उपजीविकेचा चांगलाच फायदा होतो पण नावाचं काय करायचं?
नाव नसल्याने स्थानिकांना फार काही फरक पडत नाही. याउलट या रेल्वे स्थानकाची ती एक विशेष गोष्ट बनली आहे. नाव नसून हे रेल्वे स्थानक प्रसिद्ध आहे, नाव असते तर इतके प्रसिद्ध असते का? याचे उत्तर तुम्हीच शोधा. या रेल्वे स्थानकावर यायचे असल्यास ‘रैनागर’ नावानेच तिकीट मिळते. रविवारी हे स्थानक बंद असते कारण येथील तिकीट कर्मचारी त्यादिवशी आठवड्याभराचा डेटा देण्यासाठी शहरात जातो. येथे दिवसातून ‘बंकूरा मासाग्राम’ नावाची एकच ट्रेन येते. ते ही एकदाच!