फोटो सौजन्य: Freepik
चहाचा चाहते हे आपल्या देशात किती आहेत हे सांगायची गरज नाही. लहानग्यांपासून थोरांपर्यंत सर्वेच जण चहाचा आस्वाद घेत असतात. आता तर चौकाचौकात एक अमृतुल्य उघडले आहे, जिथे नेहमीच चहाप्रेमींची गर्दी जमली असते.
त्यातही अनेकांची सकाळ चहाच्या घोटण्याशिवाय पूर्ण होत नाही. आपल्या देशात चहा हे फक्त एक पेय नाही तर काही लोकांसाठी ती गरजही बनली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्याच वेळी, असे बरेच लोक आहेत ज्यांना चहा प्यायल्यानंतर पोट खराब व्हायला लागते. खासकरून चहा प्यायल्यानंतर पोटात गॅस निर्माण होत असतो पण हे असे का होते?
चहामध्ये कॅफिन, लैक्टोज आणि टॅनिन असते. ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण जर तुमचे पोट या घटकांप्रती संवेदनशील असेल तर गॅस, ब्लोटिंग आणि ॲसिड रिफ्लक्स होतो. अशा परिस्थितीत चहा न सोडता पोटाच्या या समस्या कशा टाळता येतील, चला जाणून घेऊया.