Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवऱ्यापासून लपून बायकोने करावं असं काम, सुधा मूर्तींनी सांगितला असा होतो संसार

Relationship Tips For Wife: सुधा मूर्ती या केवळ इन्फोसिसच्या मालक म्हणूनच नाही तर सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही प्रसिद्ध आहे. पण त्याहीपेक्षा संसारासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स सुधा मूर्ती इतक्या चपखल देतात की, तुमचा संसार नक्कीच पुन्हा एकदा वठणीवर येऊ शकतो. अशीच एक टीप सुधा मूर्तींनी दिली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 08, 2024 | 06:07 PM
सुधा मूर्तींनी दिल्या संसाराच्या टिप्स

सुधा मूर्तींनी दिल्या संसाराच्या टिप्स

Follow Us
Close
Follow Us:

इन्फोसिस कंपनी सुरू करणाऱ्या एन.आर. नारायण मूर्ती यांना त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्या मदतीशिवाय हे काम कधीच शक्य झाले नसते असे त्यांनी वारंवार आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. IT कंपनी भारतात आणण्याचे जेवढे श्रेय नारायण मूर्ती यांना दिले जाते, तितकेच श्रेय त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनाही आहे. 

असे नेमके का? याचे उत्तर काही काळापूर्वी कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या सुधा मूर्ती यांनी स्वतः दिले होते. त्यांनी सांगितले होते की, जेव्हा तिचा नवरा कंपनी सुरू करण्याचा विचार करत होता तेव्हा त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यानंतर सुधा मूर्ती यांनी त्यांना घरखर्चासाठी साठवलेल्या पैशातून मदत केली आणि मग ही कंपनी उभी राहिली. यासाठी त्यांनी सर्व संसार करणाऱ्या पती – पत्नींना काही महत्त्वाचे सल्लेही दिले. त्यात पत्नीने ही एक गोष्ट केली तर संसार नक्कीच सुखाचा होतो. (फोटो सौजन्य – Instagram/iStock)

लपवून पैशाची बचत 

पैशाची बचत करणे महत्त्वाचे

सुधा मूर्ती यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या प्रत्येक महिलेला पतीपासून लपवून पैसे वाचवण्याचे आवाहन केले. याचे कारणही त्यांनी सांगितले की, एकदा पैसे दिसले की ते खर्च होतात. पण आपण पतीपासून जे पैसे लपवून ठेवतो ते योग्य वेळी संसारालाच कामी येतात. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच नवऱ्यापासून लपवून केल्यास फायदा होतो असं त्यांनी सांगितले. 

बचतीबद्दल सांगू नये 

तुम्ही तुमच्या बचतीबद्दल कोणालाही सांगू नये. असे केल्याने ते पैसे लवकर खर्च होण्याची शक्यता असते. विशेषत: जेव्हा पुरुषांना माहीत असते की घरात पैसा आहे, तेव्हा ते खर्च करण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्यामुळे त्यांच्यापासून हा पैसा कसा लपून राहील हे जास्तीत जास्त लक्षात घ्या आणि पैशांची बचत करा. 

नवऱ्याला देता येईल पाठिंबा 

पैशाची बचत करून नवऱ्याला पाठिंबा

आपल्या नवऱ्याला आर्थिक मदत करण्यासाठी काम करणे आवश्यक नाही. स्त्रियाही आपल्या बुद्धीचा वापर करून घर चालवण्यासाठी दिलेले पैसे वाचवू शकतात. आणि गरज पडल्यास याच पैशातून ती आपल्या पतीला योग्य आधार देऊ शकते आणि पूर्वपरंपरेपासून असे अनेक महिलांनी केल्याचेही त्यांनी सांगितले होते. 

नवऱ्याच्या मनात आदर वाढतो

कमी उत्पन्न असतानाही पैसे वाचवण्याचे कौशल्य केवळ कुशल स्त्रीकडेच असते. अशा महिलांना त्यांच्या पतीकडून खूप आदर मिळतो हेदेखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. आपल्या नवऱ्याला गरज असताना या पैशातून केलेली मदत नक्कीच आदरास पात्र ठरते. 

Web Title: Sudha murthy relationship tips how to work secretly from husband makes life more easy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 06:07 PM

Topics:  

  • couple
  • Relationship Tips
  • Sudha Murthy

संबंधित बातम्या

फॅमिली टाइम महत्त्वाचा! मानसिक आरोग्यापासून दीर्घायुष्यापर्यंत… कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे फायदे माहिती आहेत का?
1

फॅमिली टाइम महत्त्वाचा! मानसिक आरोग्यापासून दीर्घायुष्यापर्यंत… कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे फायदे माहिती आहेत का?

Relationship Tips : तुमचा जोडीदार घटस्फोटाचा विचार तर करत नाही ना? या 11 संकेतांद्वारे ओळखा, नाहीतर …
2

Relationship Tips : तुमचा जोडीदार घटस्फोटाचा विचार तर करत नाही ना? या 11 संकेतांद्वारे ओळखा, नाहीतर …

प्रेमात गुपितपणा! ‘पॉकेटिंग डेटिंग’ ट्रेंड नक्की काय आहे? कमिटमेंट नाही, भांडण नाही… मग कसं टिकून राहत नातं?
3

प्रेमात गुपितपणा! ‘पॉकेटिंग डेटिंग’ ट्रेंड नक्की काय आहे? कमिटमेंट नाही, भांडण नाही… मग कसं टिकून राहत नातं?

लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत ‘ सीट डिव्होर्स’, लोकांना का आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?
4

लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत ‘ सीट डिव्होर्स’, लोकांना का आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.