फोटो सौजन्य: Freepik
आपले शरीर आतून आणि बाहेरून सुद्धा चांगले असावे असे सगळ्यांनाच वाटते. एकवेळ तुमचा चेहरा अनेक क्रीम्स किंवा फेस पॅकने चांगला दिसेल पण शरीराचा काही भाग असा ही असतो ज्यमुळे आपल्याला आपल्याबद्दलच कमी पण येऊ लागतो.
बहुतेक जणांचे अंडरआर्म्स हे काळे असतात ज्यामुळे नक्कीच त्यांना या गोष्टीची चीड किंवा किळस येत असणार. आजच्या युगात अंडरआर्म्सची काळी त्वचा ही एक सामान्य समस्या बनली आहे. यामुळे विशेषतः मुलींना स्लीव्हलेस ड्रेस घालणे खूप कठीण होऊन बसते. या समस्येचा कुठेतरी आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो.
आज मार्केटमध्ये तुम्हाला अशा कित्येक क्रीम्स मिळतील ज्या दावा करतात की त्या अंडरआर्म्सचे काळेपण घालवतात. परंतु काहीवेळा हे देखील कुचकामी ठरतात. अशा परिस्थितीत घरगुती उपाय करून पाहणे प्रभावी ठरू शकते. यासाठी बटाटा हा प्रभावी आणि सोपा पर्याय आहे, जो प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतो. चला जाणून घेऊया, बटाट्याच्या मदतीने अंडरआर्म्सची काळी त्वचा कशी कमी केली जाऊ शकते.
बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स असतात, जे त्वचा स्वच्छ आणि उजळ करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले कॅटेकोलेज नावाचे एन्झाईम त्वचेचा काळेपणा कमी करण्यास मदत करते.
यासाठी सर्व प्रथम बटाटा सोलून नीट धुवून घ्या. आता बटाटा किसून त्याचा रस काढा. हा रस छोट्याश्या कापसाच्या गोळ्याने अंडरआर्म्सवर लावा. यानंतर 15-20 मिनिटे ते कोरडे होऊ द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय करा.
पहिले बटाटा सोलून त्याचा रस काढा. यानंतर बटाट्याच्या रसात लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण अंडरआर्म्सवर लावा आणि 10-15 मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने ते धुवून टाका. लिंबाचा रस त्वचेतील डेड स्किन सेल्स कमी करण्यास मदत करते. म्हणून हे मिश्रण आठवड्यातून 1-2 वेळा वापरा. लिंबू ऐवजी गुलाबपाणी देखील वापरू शकता.