'अशा' पद्धतीने करा वॉटरप्रूफ मेकअपबेस
राज्यभरात सगळीकडे शारदीय नवरात्री उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. 3 ऑक्टोबरला देवीची घटस्थापना होणार आहे. देवीची घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा करून नऊ दिवस वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्या दाखवला जातो. तसेच अनेक ठिकाणी गरबा, दांडियांचे आयोजन केले जाते. सर्वच महिला आणि मुलींना नवरात्रीमध्ये येणारी सगळ्यात पहिली आठवण म्हणजे दांडिया. रात्रभर जागून अनेक ठिकाणी मुली गरबा खेळतात. प्रत्येक सण समारंभाच्या दिवसांमध्ये महिला आणि मुलींना छान नटून थटून तयारी करायला खूप आवडते. गरबा खेळायला जाण्याआधी मुली मोठमोठे घागरे, मॅचिंग दुप्पटा, हेअरस्टाईल, मेकअप इत्यादी गोष्टी करून गरबा खेळण्यासाठी जातात.
तासनतास गरबा खेळून अनेकदा मेकअप खराब होण्याची शक्यता असते. गरबा खेळून घाम आल्यानंतर मेकअप पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे बाहेर जाताना किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना वॉटरप्रूफ मेकअप करण्यावर जास्त भर द्यावा. वॉटरप्रूफ मेकअप केल्यामुळे मेकअप लवकर खराब होत नाही आणि अधिक काळ मेकअप तसाच टिकून राहतो. बाजारात वॉटरप्रूफ मेकअपचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप प्रॉडक्ट उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ज आम्ही तुम्हाला वॉटरप्रूफ मेकअपबेस कसा करायचा, याबद्दल सांगणार आहोत. अशा पद्धतीने मेकअप बेस केल्यास लवकर मेकअप खराब होणार नाही आणि तुम्ही केलेला मेकअप अधिक काळ टिकून राहील.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चमक कमी होऊन चेहरा काळा पडत चाललाय? मग आजच आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये या रसाचा समावेश करा
हे देखील वाचा: सिंपल साडीवर हवा आहे फॅशनेबल ब्लाऊज? मग ‘या’ डिझाइन्सचे गळे नक्की ट्राय करा