गणपती उत्सवानंतर सगळेच सण एकामागोमाग एक येतात. सणांच्या दिवसांमध्ये महिलांना सुंदर नटून थटून तयार व्हायला खूप आवडत. साडी नेसून मेकअप केला जातो. तसेच साडीला सूट होतील असे दागिने परिधान करून महिला छान तयार होतात. सणासुदीचे दिवस सुरु होण्याच्या आधीच महिला साडी खरेदीला सुरुवात करतात. साडी खरेदी केल्यानंतर त्यावर छानसा ब्लाऊज शिवला जातो. पण ब्लाऊजच्या मागील गळ्याला नेमकी काय डिझाईन ठेवावी? असे अनेक प्रश्न महिलांना नेहमीच पडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ब्लाऊजच्या मागील गळ्याच्या काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य-pinterest )
सिंपल साडीवर स्टाईल करा फॅशनेबल ब्लाऊज
सिल्क आणि पैठणी साडीच्या ब्लाऊजवर तुम्ही नथ किंवा देवीच्या कोणत्याही रूपाचे चित्र बनवून घेऊ शकता. आरी वर्क करून घेतलेली ब्लॉऊज बाजारात ट्रेंडिंगला आहेत.
सिंपल किंवा प्लेन साडीवर तुम्हाला जास्त हेवी किंवा लटकन लावलेला ब्लॉऊज नको असेल तर तुम्ही या पद्धतीचे फॅब्रिक पेंटिंग बनवून घेऊ शकता. फॅब्रिक पेंटिंगमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
हल्ली ब्लॉऊजच्या मागील गळ्याला बो किंवा बो च्या आकाराची फुले बनवून लावली जातात.मागील गळ्याला बो अधिक सुंदर दिसतो.
मागील गळ्याच्या भोवती तुम्ही मोत्याची किंवा इतर रंगांच्या मण्यांची पट्टी लावल्यास तुमचा ब्लॉऊज अतिशय सुंदर आणि उठावदार दिसेल.
ज्या महिलांना जास्त हेवी किंवा वर्क केलेले ब्लॉऊज घालायला आवडत नाहीत अशांसाठी या डिझाइन्स उत्तम आहेत. कमीत कमी खर्चात या पद्धतीचा ब्लॉऊज तुम्ही शिवून घेऊ शकता.