
पावसाळ्यात पायांची योग्य काळजी घेतली नाही तर संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात पायांची निगा राखण्यासाठी खालील टिप्स वापरा. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे आरोग्यासोबतच हातापायांची योग्य निगा राखणं आवश्यक आहे. हातांची आपण योग्य काळजी घेतो, पण अनेक वेळा पायांकडे दुर्लक्ष होते. पावसाळ्यात काही संसर्ग झाले दिसून येत नाही, काही संसर्ग हे नुसत्या पावसाच्या पाण्यात चालो तरी होतात, उदा. चिखल्या ( यामध्ये पायांच्या बोट जगे मध्ये जखम होते, ती जखम घेऊव पावसात बाहेर गेला तर ती इतर लोकांना पण होते.)पावसाळ्यात रस्त्यावरील खराब पाणी किंवा चिखल यांमुळे पायांना माती लागते किंवा पावसामुळे सतत पाय ओले राहतात. यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात पायांची जास्त काळजी (Pedicure At Home) घेणं आवश्यक आहे.पावसाळ्यात पायांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरीच पेडीक्योर करु शकता.
पेडीक्योर केल्याने पाय सुंदर दिसतात.स्क्रब केल्याने पायातील रक्ताभिसरणही सुधारते.पायांची मसाज केली जाते. यामुळे तुमचा थकवा निघून जाऊन शरीर रिलॅक्स होते.पायावरील डेड स्किर निघून जाते आणि टाचांना भेगा पडण्याच्या समस्येपासून सुटका होते. पायांना नवी चमक येते.
एका टब किंवा बादलीमध्ये कोमट पाण्यात पाय भिजवा. या पाण्यात आता थोडा शॅम्पू टाका आणि यामध्ये पाय १५ ते २० मिनिटं ठेवा. यानंतर पाण्यातून पाय बाहेर काढा आणि पायांना स्क्रब करा. १० ते १५ मिनिटं स्क्रब करुन पाय स्वच्छ होतील, तसेच कोमट पाण्यात लिंबू आणि मीठ टाकून ठेवल्यास पायांना अराम मिळतो.