तेजस्वी यादवची लव्ह स्टोरी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
राष्ट्रीय जनता दल (RJD) चे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे आजच्या आघाडीच्या राजकारण्यांमध्ये आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीसोबतच त्यांची प्रेमकहाणीही खूप चर्चेत आहे. बिहारमधील सर्वात पात्र अविवाहितांपैकी एक असलेल्या तेजस्वी यादव यांचे लग्न झाले तेव्हा हजारो महिलांचे मन दुखावले होते. एका वेळी ४४,००० मुलींनी तेजस्वी यादव यांना WhatsApp वर प्रपोजल पाठवले होते.
तेजस्वी यादव यांचे लग्न चर्चेचा विषय बनले तेव्हा सर्वांना जाणून घ्यायचे होते की ती भाग्यवान मुलगी कोण आहे. तेजस्वी यादव यांनी डिसेंबर २०२१ मध्ये राजश्रीशी लग्न केले. त्यावेळी त्यांच्या लग्नाचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली कारण ते एका ख्रिश्चन मुलीशी लग्न करणार होते. त्यांच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता अशाही बातम्या आल्या होत्या. नुकतेच तेजस्वीने राजकारणातील बदलते स्वरूप आणि अगदी Love Life याबाबत ‘अनफिल्टर्ड बाय समधीश’ मध्ये मनसोक्त गप्पा मारल्या.
१२ वर्ष केले होते डेटिंग
संभाषणादरम्यान, तेजस्वी यादवने त्याच्या वैयक्तिक आयुष्याची आठवण करून दिली, जेव्हा तो रिलेशनशिपमध्ये होता त्या काळाची आठवण यावेळी त्याने जागवली. तेजस्वीने समधीशला सांगितले की,
“आम्ही १२ वर्ष डेट करत होतो. जेव्हा आम्ही प्रेमात पडलो तेव्हा आम्ही शाळेत होतो. ती वेगळ्या शाळेत होती. आम्ही दिल्लीत होतो. आई राजकारणात होती आणि बाबा जेलमध्ये गेले होते तेव्हा दिल्लीत शिफ्ट झालो आणि त्यानंतर ती माझ्या आयुष्यात आली. रचेल कॅथोलिक होती, पण माझ्या किंवा तिच्या कुटुंबाला कधीही याबद्दल कोणतीही समस्या आली नाही”
तेजस्वी यादव आणि राजश्री यांची भेट कशी झाली?
तेजस्वी यादव यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण बिहारमध्ये पूर्ण केले, परंतु नववीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. त्यांनी आरके पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) मध्ये प्रवेश घेतला. त्यांची पत्नी राजश्री देखील त्याच शाळेत शिकली आणि त्यांची भेट तिथेच झाली. ते एकाच वर्गात होते, त्यामुळे त्यांची मैत्री झाली आणि त्यानंतर १२ वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केले. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि त्यांनी २०२१ मध्ये लग्न केले. या गोष्टीबाबत दोघांच्या घरी वा अगदी मीडियालादेखील काहीच माहीत नव्हते.
लालू प्रसाद यादव तेजस्वी आणि राजश्रीच्या नात्यावर नाखूष
राजश्री ख्रिश्चन आहे आणि तिचे कुटुंब दिल्लीत राहते. तेजस्वी आणि राजश्रीच्या लग्नापूर्वी, अशा अफवा पसरल्या होत्या की राष्ट्रीय जनता दल (राजद) चे प्रमुख लालू प्रसाद यादव या नात्यावर नाराज होते. त्यांची नाराजी राजश्रीच्या ख्रिश्चन असल्यामुळे होती. लालू प्रसाद यादव यांनी राजश्रीला भेट म्हणून काहीही दिले नसल्याच्या बातम्याही आल्या होत्या. याबद्दल विचारले असता लालू प्रसाद यादव म्हणाले, “आम्ही आधीच आमचा मुलगा राजश्रीला दिला आहे. आता आणखी काय हवे आहे?” त्यांनी असेही स्पष्ट केले की. त्यांच्या नात्याबाबत त्यांना कोणताही राग नव्हता आणि लग्न त्यांच्या संमतीने झाले.
काय होती अफवा?
जेव्हा लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वीला लग्न करायचे आहे का आणि त्यांना दुसरी मुलगी आवडते का असे विचारले तेव्हा तेजस्वीने त्यांच्या वडिलांना राजश्रीबद्दल सांगितले. अनेक वृत्तांतांमध्ये असेही म्हटले आहे की जेव्हा राजश्रीचे नाव समोर आले तेव्हा लालू यादव यांच्या कुटुंबात तिच्या ख्रिश्चन धर्मामुळे बराच वाद झाला. तेजस्वीला त्यांच्या प्रेमावर विश्वास होता आणि त्यांनी सर्वांना राजश्रीशी लग्न करण्यास राजी केले. जेव्हा संपूर्ण कुटुंब सहमत झाले तेव्हा तेजस्वी आणि राजश्री यांचे डिसेंबर २०२१ मध्ये लग्न झाले. त्यांना कात्यायनी नावाची एक मुलगी आहे आणि याचवर्षी त्याला पुत्रप्राप्तीदेखील झाली आहे.
ChatGPT तुमचं नातं वाचवू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं AI Therapy Trend नात्यासाठी योग्य आहे की नाही
तेजस्वी यादव यांची पत्नी एअर होस्टेस
तेजस्वी यादवच्या पत्नी राजश्री यांनी एअर होस्टेस म्हणूनही काम केले आहे आणि बराच काळ बार्कलेजमध्ये काम केले आहे. तिच्या नावाबद्दल बरीच चर्चा झाली. तिचे मूळ नाव रचेल आहे, परंतु तिच्या लग्नाच्या वेळी तिला राजश्री हे नाव देण्यात आले होते. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले की तिचे नाव उच्चारण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तिचे नाव राजश्री ठेवण्यात आले आणि लालू प्रसाद यादव यांनी तिला हे नाव दिले.