Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्‍कलदाढ येताना होणाऱ्या भयंकर वेदना! घरगुती आणि जालीम उपाय; झटकन मिळेल आराम

अक्कल दाढ येताना हिरड्या सुजतात आणि वेदना होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया असते ती प्रत्येकाबरोबर होतेच. अक्‍कल दाढेच्या वेदना कधीही होऊ शकतात. एक दोन दिवस या वेदना होत राहतात. यासाठी काही घरगुती उपाय केल्यास निश्तित आराम मिळेल(Terrible pain that comes when you have a wisdom toothache Home remedies and remedies Get relief quickly).

  • By Vanita Kamble
Updated On: Apr 13, 2022 | 04:37 PM
Terrible pain that comes when you have a toothache! Home remedies and remedies; Get relief quickly

Terrible pain that comes when you have a toothache! Home remedies and remedies; Get relief quickly

Follow Us
Close
Follow Us:

आपल्यापैकी बहुतेकांना 17 ते 21 वर्षे वयात अक्‍कलदाढ येते. हा अनुभव इतर दातांच्या तुलनेत अतिवेदनादायी असतो. अनेकांना वयाच्या पंचवीशीनंतरही अक्‍कलदाढ येते. हे दात खूप मजबूत असतात. त्यामुळे ते येण्यास खूप उशीर होतो. आपल्या जबड्यामध्ये 28 दात असतात आणि संपूर्ण जबड्यात हे दात आपली जागा व्यापून घेतात; पण अक्‍कल दाढा मात्र खूप उशिरा येतात. त्यामुळे जबड्यात त्यांना येण्यास जागा राहिलेली नसते, त्यामुळेच अक्‍कलदाढ येताना खूप वेदना होतात. त्याचबरोबर हिरड्यांवर दाब येतो. त्यामुळेच दातात वेदना, हिरड्या सुजतात आणि वेदना होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया असते ती प्रत्येकाबरोबर होतेच. अक्‍कल दाढेच्या वेदना कधीही होऊ शकतात. एक दोन दिवस या वेदना होत राहतात(Terrible pain that comes when you have a wisdom toothache Home remedies and remedies Get relief quickly).

लवंग

दाताच्या वेदनांसाठी बहुतेक लोक लवंगांचा वापर करतात. लवंग दातामध्ये दाबून धरल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. लवंगेत अ‍ॅनस्थेटिक आणि अ‍ॅनलगेसिक गुण असतात, त्यामुळे वेदना दूर होण्यास मदत होते. दिवसातून दोन तीनवेळा लवंग दाताखाली धरावी आणि त्या दरम्यान काही खाऊ नये.

मीठ

मिठाचा वापर केल्यास फायदा होतो. वेदना दूर करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. ते पाणी तोंडात धरून शेकवा. दातामध्ये होणारा संसर्ग दूर होतो आणि वेदनांपासून मुक्‍तता मिळते. सकाळी दात घासताना देखील मिठाच्या पाण्याचा वापर करावा.

लसूण

यामध्ये जीवाणूप्रतिरोधक गुण असतात, शिवाय त्यात प्रतिजैविक, दाह कमी करण्याचे आणि इतर औषधी गुण असतात. त्यामुळे अक्‍कल दाढ येतानाच्या वेदना कमी होतात. लसूण सोलून त्याच्या पाकळ्या लावल्या तर दातांच्या वेदनेत आराम मिळतो. दिवसातून दोनवेळा दोन दोन लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यास दाताच्या वेदना कमी होतात.

हिंग

हिंगामध्ये अनेक आयुर्वेदिक गुण आहेत. त्यात दाह कमी करणारे, अँटिसेप्टिक गुण असतात त्यामुळे दातांच्या वेदनांपासून मुक्‍ती मिळते. अगदी थोडा हिंग घेऊन तो दातांला होणार्‍या वेदनांच्या जागी लावावा किंवा एक चतुर्थांश पाण्यात हिंग मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

कांदा

दाताच्या वेदनांसाठी कांदा जादूगार आहे. त्याच्या वापराने दाताच्या वेदनांपासून आराम मिळेल. कांदा कच्चा खाल्ल्यास दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो; पण दातांना होणाऱ्या वेदनांमुळे कांदा कच्चा खाऊ शकत नसाल तर त्याच रस काढून लावावा.

पेरूची पाने

पेरूची कोवळी पाने तोडून स्वच्छ धुवून घ्या आणि दुखणाऱ्या दाताखाली ती पाने दाबावीत. त्यामुळे दाताच्या वेदना कमी होतात. दर दिवशी चारवेळा ही पाने चावल्यास खूप आराम मिळतो. शक्य असल्यास ही पाने एक कप पाण्यात उकळून त्या पाण्याने माऊथवॉश सारख्या गुळणा कराव्यात.

[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]

[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]

[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]

[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]

[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]

Web Title: Terrible pain that comes when you have a wisdom toothache home remedies and remedies get relief quickly nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2022 | 04:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.