नारळी पौर्णिमेनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
श्रावण महिन्यात येणारा दुसरा म्हणजे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सगळीकडे मोठा उत्साह असतो. या दिवशी घरात नारळाचा वापर करून अनेक गोड पदार्थ बनवले जातात. याशिवाय कोळी बांधव सुमद्राला नारळ अर्पण करतात. त्यानंतर समुद्र किनारी राहणारे कोळी लोक मासेमारी करणाऱ्यास सुरुवात करतात. यंदाच्या वर्षी ९ ऑगस्टला नारळी पौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नारळी पौर्णिमेला प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मराठमोळ्या आणि गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)
कोळी बांधवांची परंपरा,
मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची…
नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवांना शुभेच्छा!”
कोळीवारा सारा सजलाय गो
कोळी यो नाखवा आयलाय गो
मासळीचा दुष्काळ सरु दे
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे
सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा…!
दर्यासागर हाय आमचा राजा,
त्याचे जीवावर आम्ही करताव मजा,
नारले पुनवेला नारल सोन्याचा,
सगले मिलून मान देताव दरियाचा
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा…!
“मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरूवात असणार्या
नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हांला सुख, शांती समृद्धी घेऊन येवो,
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा”
“नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती..
घराघरात आज नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
“नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला
आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!”
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे…
कोळी बांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!
सण आयलाय गो, आयलाय गो
नारळी पुनवचा..
मनी आनंद मावना
कोळ्यांच्या दुनियेचा
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
एक नारळ दिलाय दर्या देवाला,
वरसाचा मान देव दर्या देवाला….
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
सागराची पूजा-नृत्य अन् गाणी
नारळी पौर्णिमा करितो साजरी
कोळीबांधव अर्पून श्रीफळ सागराच्या चरणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
कोळीवारा सारा सजलाय गो…!
कोळी यो नाखवा आयलाय गो…!
‘मासळीचा दुष्काळ सरु दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे’
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी!
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रुपेरी वाळुचा साज!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे
कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
Narali Purnima 2025: सण आयलाय गो… कधी आहे नारळी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व
कोळी बांधवांचा सण उधाण आनंदाला
कार्यारंभ करती वाहूनी श्रीफळ सागराला
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
“दर्या माझ्या भावा
कृपा कर मझं वरी
खळवळू नको आम्हावरी
हीच आमुची मागणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…”
देव वरुण तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करो आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो,
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
“नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हाला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!””नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी कोळी बांधव प्रार्थना करती..
घराघरांत आज नैवेद्याला नारळी भात,
सागराला सोन्याचा नारळ वाहून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
नारळी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी वरुण राजा तुमचे जीवन खूप आनंद, समृद्धी आणि यशाने भरुन जावो,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!