कसारा घाटात अनेक भयाण घटना घडण्याचे ऐकण्यात आले आहे. (फोटो सौजन्य - Social Media)
कसारा घाटात एक वडाचे झाड आहे. अतिशय सुकलेले हे झाड आहे. याला पाहताच बघणाऱ्याला घामाच्या धारा लागतात. या वडाच्या झाडामागे काही रहस्य आहेत.
अनेकांनी या झाडावर एका जखीणीला पाहिले असल्याचे अनेकदा ऐकण्यात येते. मध्य रात्रीच्या सुमारास या झाडाच्या शेजारी गाडी थांबवून निवारा घेणाऱ्या प्रवाशांना ही जखीण तिचे दर्शन देते.
अनेकांनी तर त्यांच्या गाड्यांच्या मागे या जखीणीला पाठलाग करताना पाहिले आहे. कधी कधी तर त्या ठिकाणातून विचित्र आवाज येण्याचे देखील ऐकण्यात आले आहे.
कसारा घाटात अनेक अपघात होतात. त्यातील अनेक जण बहुतेक अपघातांची लिंक तेथील भयाण वातावरणाशी करतात.
ही प्राथमिक माहिती असून यातील सर्व घटनांबाबत आमचा कोणताही दावा करण्यात आलेला नाही.