PCOS आणि थायरॉईडमधील संबंध जाणून घेऊया
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि थायरॉईड हे दोन्ही आजार महिलांमध्ये सामान्य आहेत. उपचार न केलेले हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझमध्ये पीसीओएस सारखीच लक्षणे दिसून येऊ शकतात. दीर्घकाळ टिकणारे व गंभीर हायपोथायरॉईडीझममध्ये प्रत्यक्षात पीसीओएस सारखीच लक्षणे दिसून येऊ शकतात आणि हायपोथायरॉईडीझमवर उपचार केल्याने सर्व लक्षणे कमी होऊ शकतात.
पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये, योग्यरित्या नियंत्रित नसलेले थायरॉईड आजारांमुळे त्यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. तसेच, हायपोथायरॉईडीझममुळे वजन वाढू शकते आणि इन्सुलिन प्रतिरोध होऊ शकतो, ज्यामुळे पीसीओएस आणखी खालावू शकतो. म्हणून, पीसीओएस असल्याचा संशय असल्यास महिलांनी थायरॉईड आजार आणि प्रोलॅक्टिनचे निदान करण्यासाठी चाचणी करावी. तज्ज्ञ डॉ. श्वेता बुदयाल, कन्सल्टण्ट एण्डोक्रिनोलॉजिस्ट अँड डायबेटोलॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
PCOS झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे? वेळीच लक्ष देऊन घ्या आरोग्याची काळजी
काय सांगतात तज्ज्ञ
दरम्यान न्यूबर्ग अजय शाह लॅबोरेटरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी सांगितले की, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि थायरॉईड हे दोनही विकार अनेकदा एकत्र असतात, ज्यामुळे अनेक महिलांच्या हार्मोनल आणि प्रजनन आरोग्यावर परिणाम होतो. दोन्ही विकार हार्मोनल असंतुलनाशी संबंधित असल्याने वजन वाढणे, मासिक पाळीमधील अनियमितता, केस गळणे आणि वंध्यत्व यांसारखी दोन्ही मध्ये आढळणारी लक्षणे जाणवतात ज्यामुळे निदान आणि उपचार थोडे आव्हानात्मक बनते.
कसा होतो परिणाम
हायपोथायरॉईडीझम, पीसीओएस शी संबंधित सर्वात सामान्य थायरॉईड विकार, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढतो पर्यायाने मासिक पाळीत व्यत्यय येऊन गर्भाशयाचे बिघडलेले कार्य अजूनच बिघडवून पीसीओएसची लक्षणे वाढवू शकतो. हायपोथायरॉईडीझममध्ये थायरॉईड-स्टीम्युलेटींग हार्मोन्स (टीएसएच) च्या वाढलेल्या स्तरामुळे गर्भाशयातील अँड्रोजन उत्पादन वाढू शकते परिणामी मुरुमे आणि केसांची अतिरिक्त वाढ यासारख्या पीसीओएस संबंधित समस्या तीव्र होतात.
काय आहेत लक्षणे
याउलट, हायपरथायरॉईडीझम मध्ये पीसीओएसशी साधर्म्य दाखविणारी लक्षणे दिसू शकतात, ज्यामुळे चुकीचे निदान होण्याची शक्यता असते. या संबंधामुळे, पीसीओएसचे निदान झालेल्या महिलांनी थायरॉईडच्या सह-अस्तित्वात असलेल्या समस्या नसल्याची खातरजमा करण्यासाठी किंवा त्यांवर उपाययोजना करण्यासाठी थायरॉईड फंक्शन चाचण्या कराव्यात. जीवनशैलीतील बदल, औषधे आणि नियमित देखरेखीद्वारे दोन्ही आजार एकाच वेळी हाताळल्याने एकूण आरोग्य आणि प्रजनन परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
पुरुषांनी थायरॉईड चाचणी करावी का? या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका
PCOS म्हणजे नेमके काय
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा एक हार्मोनल असंतुलन आहे. महिलांमध्ये ही एक सामान्य समस्या आहे. यामध्ये, अंडाशयात अनेक द्रवपदार्थांनी भरलेल्या पिशव्या (सिस्ट) तयार होतात. या पिशव्यांमुळे अंडाशय मोठे होतात. अनेक मुलींना आणि महिलांना सध्या पीसीओएसची समस्या झाल्याचे दिसून येते. त्यामुळे यावर व्यवस्थित आणि वेळ न काढता महिलांनी योग्य माहिती घेणे गरजेचे आहे अन्यथा मोट्या व्यक्तींनीस स्गंगितेल्या गोष्टी समजावून घेणे आणि मुलांना नक्कीच त्रासदयाक ठरू शकते