बद्धकोष्ठतेची समस्या होईल कायमची दूर! सकाळी उठल्यानंतर 'या' पद्धतीने करा भिजवलेल्या अंजीरचे सेवन
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता आणि पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आहारात तिखट किंवा अतितेलकट पदार्थांचे खूप जास्त सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. पोटात वाढलेला गॅस, अपचन आणि ऍसिडिटीमुळे शरीरात अतिरिक्त पित्त जमा होते. यामुळे आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक आरोग्याला हानी पोहचवतात. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. बद्धकोष्ठता झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यास आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)
कायमच निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. आहारात सुकामेवा खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात. बदाम, अक्रोड, खजूर, मनुका इत्यादी अनेक पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. त्यातील गुणकारी पदार्थ म्हणजे सुकवलेले अंजीर. अंजीर खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. हाडांमध्ये वाढलेली कमजोरी, सतत अशक्तपणा, थकवा आणि हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी समस्या अतिशय समस्या झाल्या आहेत. नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला अंजीर खाण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
दैनंदिन आहारात अंजीरचे नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक फायदे होतात. अंजीरामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे आतड्यांच्या हालचाली सुधारतात. बऱ्याचदा अन्नपदार्थ सहज पचन होत नाही किंवा पोट फुगल्यासारखे वाटते अशावेळी भिजवलेले अंजीर खावे. यामुळे शरीरातील जुनाट बद्धकोष्ठता कायमची नष्ट होईल आणि आरोग्य सुधारेल. नियमित पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर भिजवलेल्या अंजिराचे सेवन करावे.
शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक करून टाकते. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्टोक येऊ शकतो. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कायमचे नष्ट करण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर भिजवलेले एक किंवा दोन अंजीर खावे. यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे हृदयावर जास्तीचा तणाव येत नाही आणि रक्तदाब कायमच नियंत्रणात राहतो. हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो.
मधुमेह राहील कायमच नियंत्रणात! नियमित फॉलो करा १०-१०-१० चा नियम, शरीरात दिसून येईल सकारात्मक बदल
वाढत्या वयात हाडांमधील कॅल्शियम कमी होऊन जाते. तसेच हाडांसंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी एक किंवा दोन अंजीर खावे.यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर कॅल्शियमची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळे नियमित एक किंवा दोन अंजीर खावे.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
बद्धकोष्ठता म्हणजे मल (शौच) बाहेर टाकताना वारंवार त्रास होणे आणि आतड्याची हालचाल क्वचितच होणे.या स्थितीत आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा आतड्याची हालचाल होऊ शकते.
बद्धकोष्ठतेची कारणे काय आहेत?
फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांचे कमी सेवन. पुरेसे पाणी न पिणे, ज्यामुळे आतड्यातील मल कठीण होतो.
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी उपाय:
आहारात फळे, भाज्या, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. जास्त चरबीयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा. दिवसातून किमान 6 ते 8 ग्लास पाणी प्या. कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.