मधुमेह राहील कायमच नियंत्रणात! नियमित फॉलो करा १०-१०-१० चा नियम
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा तणाव, पोषक घटकांची कमतरता, सतत गोड पदार्थांचे सेवन, मानसिक ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा मधुमेह नियंत्रणात राहत नाही. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने औषध उपचार करणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.(फोटो सौजन्य – istock)
हल्ली कोणत्याही वयातील व्यक्तीला मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर आजारांची लागण होते. त्यामुळे आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर अनेक लोक मेथी दाणे, चिया सीड्स किंवा कारल्याच्या रसाचे सेवन करतात. पण यामुळे सुद्धा मधुमेह नियंत्रणात राहत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी १०-१०-१० चा नियम म्हणजे काय? हे नियम कसे फॉलो करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे नियमित फॉलो केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील आणि आरोग्य कायमच निरोगी राहील.
अधिक वेळ एकजागेवर बसून राहिल्यामुळे शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण होतो. याशिवाय अननपदार्थ सहज पचन होत नाही. शारीरिक हालचाली न केल्यामुळे स्नायू ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नाहीत. त्यामुळे दर ४५ मिनिटांनी १० स्क्वॅट्स करण्याचा सल्ला पोषणतज्ज्ञांनी दिला आहे. स्क्वॅट्स मारल्यामुळे पायांमधील स्नायूंची हालचाल होते आणि रक्तातील साखर शोषून घेऊन ऊर्जेमध्ये रूपांतरित होते.त्यामुळे महिनाभर हा नियमित फॉलो केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
जेवल्यानंतर शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. रक्तात वाढलेली साखर कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. त्यामुळे जेवणानंतर नियमित १० मिनिटं चालल्यास रक्तातील साखर विरघळून जाते.यामुळे रक्तातील साखर सुमारे २२ मिग्रॅ/डीएल (mg/dL) ने कमी होते. चालल्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. याशिवाय शरीरात कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाचा धोका सुद्धा वाढत नाही. नियमित जेवणानंतर १० मिनिटं चालल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. व्हाईट ब्रेड किंवा मैदाऐवजी ब्राऊन राइस, ओट्स आणि मिलेट्स इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढत नाही. याशिवाय भाज्या, फळे आणि डाळीचे सेवन आहारात नियमित केल्यास मधुमेह वाढत नाही. आहारात गोड किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे अजिबात सेवन करू नका.
रोज विड्याचं पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे; काय सांगतं आयुर्वेद ?
मधुमेहाची कारणे:
स्वाद कळ्या इन्सुलिनचे उत्पादन कमी करतात किंवा थांबवतात, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. शरीरातील स्नायू उत्पादित होणाऱ्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाहीत.
मधुमेहाची लक्षणे:
भाजेली तहान, वारंवार मासिक पाळी येणे, खूप भूक लागली आहे,अंध दृष्टी, थकवा इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात.
मधुमेहाचे व्यवस्थापन कसे करावे?
कार्बोहायड्रेटचे सेवन नियंत्रित करा, फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खा. नियमित शारीरिक हालचालींमुळे स्नायू ग्लुकोज वापरतात आणि रक्तातील साखर कमी होते.