
Omega 3 चा प्रजननक्षमेतेशी काय संबंध आहे (फोटो सौजन्य - iStock)
पुरुष आणि महिलांनी हे समजून घेतले पाहिजे की प्रजनन आरोग्याच्या बाबतीत त्यांचा आहार ही महत्त्वाची भूमिका बजावतो. आहाराच्या दैनंदिन सवयींवर लक्ष देणे, प्रजनन क्षमता तपासणे, पोषक तत्वांचा आहारात समावेश करणे याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. ओमेगा-३ फॅटी ॲसिड हे हार्मोन्स संतुलित करण्यास, शरीरात दाह कमी करण्यास आणि स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. गर्भधारणेस प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी ओमेगा-३ ची भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. शिखा मलिक, वंधत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टीलिटी, कल्याण, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
पुरूषांनो सावधान! निरोगी असूनही वाढत्या वयात कमी होते Fertility, काय आहे कारण
ओमेगा-३ आणि प्रजननक्षमता यांच्यातील परस्परसंबंध
ओमेगा-३ फॅटी अॅसिड महिलांमध्ये हार्मोनल संतुलन आणि नियमित ओव्हुलेशन प्रक्रियेत मदत करते. ते प्रजनन अवयवांमध्ये रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतात आणि निरोगी स्त्रीबीज आणि गर्भधारणेच्या विकासास फायदेशीर ठरतात . ओमेगा-३ हे पीसीओएस किंवा एंडोमेट्रिओसिस सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या महिलांसाठी उपयुक्त आहे जे प्रजननक्षमतेवर सकारात्मक परिणाम करते.
पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर, ओमेगा-३ हे शुक्राणूंची गुणवत्ता वाढवते. नियमितपणे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि आकार वाढण्यास मदत होते, ज्यामुळे शुक्राणूंना स्त्रीबीजापर्यंत पोहोचणे आणि स्त्रीबीज फलित करणे शक्य होते. ओमेगा-३ टेस्टोस्टेरॉनची पातळी चांगली राखण्यास देखील मदत करते आणि शुक्राणूंच्या डीएनएला नुकसान पोहोचविणाऱ्या रोखते. संशोधनानुसार ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या सेवनाने नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता सुधारते आणि प्रजनन उपचारांदरम्यान देखील चांगले परिणाम मिळतात. प्रत्येकाने आहार तसेच प्रजननक्षमतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
आहारात काय खावे