पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर काय होतोय परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
निरोगी असल्यावर प्रजनन क्षमतेवर परिणाम होतच नाही असे नाही. तुम्हाला माहिती आहे का? वय हे पुरुषांच्या प्रजनन प्रणालीवर परिणाम करतात. निरोगी असूनही पुरुषांना गर्भधारणेस संघर्ष करावा लागतो. याठिकाणी तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या टिप्सदेखील दिल्या आहे ज्या पुरुषांनी न चुकता पाळल्या पाहिजेत. डॉ. मधुकर ज. शिंदे, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पीसीएमसी, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
निरोगी असूनही समस्या
बऱ्याच पुरुषांचा असा विश्वास आहे की जोपर्यंत ते निरोगी, सक्रिय आहेत तसेच त्यांना कोणताही मोठा आजार नाही तोपर्यंत त्यांची प्रजनन क्षमता अबाधित राहते. महिलांप्रमाणे पुरुषांमध्ये अचानक प्रजनन क्षमता कमी होत नसली तरी, पुरुषांच्या प्रजनन क्षमतेच्या बाबतीत वय महत्त्वाची भूमिका बजावते.
हल्ली करिअरमुळे लग्नास विलंब होतो आणि त्यामुळे उशीराने कुटुंब सुरू करतात, त्यांना असे वाटते की त्यांचे आरोग्य चांगले आहे म्हणजे गर्भधारणा सहजच शक्य आहे. ते आपल्या वाढत्या वयाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करतात जे हार्मोनल असंतुलन, ताणतणाव आणि अनुवांशिक समस्यांशी जोडले जातात. मोठ्या संख्येने पुरुषांना त्यांच्या प्रजनन क्षमतेबद्दल माहितीच नसते. त्यामुळे आरोग्य समस्या नसतानाही केवळ वाढत्या वयामुळे पुरुषांना अनपेक्षित प्रजनन समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
वाढत्या वयात पुरुषांना गर्भधारणेसाठी संघर्ष का करावा लागतो?
पुरुषांनी काय करावे?
वाढत्या वयात पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करु इच्छिणाऱ्या पुरुषांनी वंधत्व निवारण तज्ज्ञांचा सल्ला घ्या जे तुमच्यासाठी योग्य उपचार योजना आखतील. तज्ञ तुमचे संपूर्ण मूल्यांकन करतील आणि संतुलित आहार, व्यायाम, मेडिटेशन करुन तणावाची पातळी कमी करतील आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॅाल सारख्या परिस्थितींसाठी औषधांचे सेवन तसेच जीवनशैलीतील बदल सुचवतील. वंधत्व निवारण तज्ज्ञांनी दिलेल्या अँटीऑक्सिडंट्ससह काही औषधं ही डीएनए फ्रॅगमेंटेशन दुरुस्त करण्यात लक्षणीयरीत्या मदत करतील. वाढत्या वयात पुरुषांनी प्रजनन आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.






