
प्रोस्टेट समस्या नक्की काय आहे (फोटो सौजन्य - iStock)
वय वाढल्यावर प्रोस्टेटचा आकार वाढण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या समस्या वयानुसार ग्रंथीच्या वाढीमुळे (benign prostatic hyperplasia), संसर्गामुळे किंवा प्रोस्टेट कॅन्सरमुळे होऊ शकतात. डॉ. शीतल मुंडे, डॉक्टर इन्चार्ज आणि कन्सल्टंट – हिस्टोपॅथॉलॉजिस्ट, ग्लोबल रेफरन्स लॅबोरेटरी, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड यांनी दिली अधिक माहिती.
GLOBOCAN 2022 नुसार, प्रोस्टेट कॅन्सर हा जगातील पुरुषांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर असून कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. वय वाढल्यास, विशेषतः 50 वर्षांनंतर, प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक असतो. विशेषतः वय वाढल्यावर, अशी प्रोस्टेट समस्येची ‘सायलेंट साईन्स’ दुर्लक्षित करू नयेत.
लघवीसंबंधी त्रास:
प्रोस्टेट मूत्रमार्गाभोवती असल्यामुळे त्याच्या आकारात बदल झाला की लघवीचा प्रवाह अडथळला जाऊ शकतो. हे बदल प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. लक्षणांमध्ये समावेश होतो:
Prostate Problem वर काय आहे आयुर्वेदिक उपाय, बाबा रामदेवांनी दिल्या काळजी घेण्याच्या टिप्स
लैंगिक आणि स्खलनासंबंधी त्रास
प्रोस्टेट ग्रंथी प्रजननाशी थेट संबंधित असल्यामुळे त्यातील कॅन्सरमुळे स्खलनात वेदना, इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा वीर्यात रक्त दिसणे अशी लक्षणं दिसू शकतात.
पेल्विक भागात वेदना
प्रोस्टेट कॅन्सर वाढल्यावर तो आसपासच्या स्नायूंमध्ये आणि अवयवांमध्ये पसरू शकतो, ज्यामुळे पेल्विक भागात, पाठीच्या खाली आणि नितंबांमध्ये वेदना होऊ शकते.
वजन कमी होणे, अशक्तपणा आणि थकवा:
ही लक्षणं सर्वसाधारण असली तरी काही वेळा ती प्रोस्टेट कॅन्सरचे सूचक असू शकतात.
हाडांमध्ये वेदना
प्रोस्टेट कॅन्सर हाडांमध्ये पसरू शकतो (metastasis), ज्यामुळे हाडांमध्ये वेदना जाणवते. कोणतीही नवीन किंवा अचानक आलेली हाडांची वेदना त्वरित तपासायला हवी. प्रोस्टेट कॅन्सरची जोखीम वाढवणारे घटक:
प्रोस्टेट कॅन्सरसाठी तपासण्या आणि निदान पद्धती:
नियमित आरोग्य तपासणी आणि कोणतीही संशयास्पद लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, हे दीर्घकाळासाठी निरोगी जीवन आणि कॅन्सरमुक्त आयुष्य जगण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे.
पुरूषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या Prostate Cancer ची सुरूवातीची 5 लक्षणे, वेळीच ओळखा