प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)
प्रोस्टेट कॅन्सर हा पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होणारा एक गंभीर आजार आहे. हा कॅन्सरचा एक प्रकार असून अक्रोडाच्या आकाराचे प्रोस्टेट ग्लँडमध्ये आढळतात. वास्तविक गेल्या काही वर्षांपूर्वी वयाच्या 50 व्या वर्षानंतर हा प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांना झालेला आढळून येत असे. पण नुकत्यात आलेल्या एका अहवालानुसार, दावा कऱण्यात आला आहे की, कमी वयाच्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. दिल्लीतील युनिक हॉस्पिटल कॅन्सर मेडिकल सेंटरच्या मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आशिष गुप्ता यांनी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत अधिक माहिती दिली असून प्रोस्टेट कॅन्सर वाढत असल्याचे सांगितले आहे.
प्रोस्टेट कर्करोग म्हणजे काय आणि कशी करावी तपासणी? प्रत्येक पुरूषाला माहीत असायलाच हवे
WHO चा अहवाल
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने दिलेल्या अहवालात सिद्ध झालेल्या आकडेवाडीनुसार, 2022 मध्ये भारतात 37,948 प्रोस्टेट कॅन्सरच्या केस समोर आल्या होत्या. तर ही आकडेवारी वाढून साधारण 14 लाख प्रोस्टेट कॅन्सरच्या नव्या केस यावर्षी समोर आल्या आहेत आणि ज्या गेल्या तीन वर्षात तीन पट असल्याचे दिसून आले आहे. डॉ. गुप्ता यांच्या सांगण्यानुसार, सुरूवातीलाच जर प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे ओळखता आली तर त्यावर लवकर उपाय करता येऊ शकतात.
भारतात प्रोस्टेट कॅन्सरबाबत कळणे ही मोठी समस्या आहे. डॉ. गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेत प्रोस्टेट कॅन्सरबाबत 80 टक्के रूग्णांना सुरूवातीलाच याबाबत माहिती मिळते, पण भारतात मात्र याचा आकडा अगदी विरूद्ध आहे.
जीवनशैली बदल ठरतोय प्रोस्टेट कर्करोगासाठी कारणीभूत – कर्करोग तज्ज्ञांचा इशारा
प्रोस्टेट कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे
तज्ज्ञांच्या मते अनेकदा प्रोस्टेट कॅन्सर हा सुरूवातीच्या स्टेजवर कळूनच येत नाही आणि याची कोणतीही खास लक्षणे दिसून येत नाही. यापासून बचावासाठी नियमित प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन (PSA) टेस्ट करावी आणि तपासणीच्या माध्यमातून पुरुष आपल्या आरोग्यावर नियंत्रण ठेऊ शकतात आणि प्रोस्टेट कॅन्सर वाढण्याचा त्रास कमी करू शकतात.
वाढत्या प्रोस्टेट कर्करोगाची चिन्हे आणि लक्षणे यात समाविष्ट असू शकतात:
डॉक्टरांना कधी भेटावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जर तुम्हाला कोणतीही लक्षणे आढळली तर डॉक्टर किंवा इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांशी संपर्क साधा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.