यंदाचा गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. गणेशमूर्ती सुंदर कशी दिसेल, यावर प्रत्येक भक्तांची इच्छा आहे. त्यामुळे आता विविधरंगी वस्त्रांचा वापर करून कॉस्च्युम डिझाइनर बाप्पाला सजवत आहेत.
गणेशमूर्ती सजीव आणि रेखीव दिसण्यासाठी अनेक मंडळे श्रीगणेशाला धोतर, फेटा, वस्त्रांचा वापर करत आहेत. सध्या श्री गणेशाला विविधरंगी वस्त्रांच्या माध्यमातून अधिकच सुंदर बनविण्याचे काम करत आहेत. एका गाठीवर श्री गणेशाला धोतर बांधणे ही त्यांची खासियत असून, त्यांच्याकडे पंढरपूरपर्यंतची बुकिंग यंदा आहेत. शहरातील किमान दोनशे मोठ्या व सहाशे छोट्या गणेशमूर्तीवर सध्या कॉस्च्युम करण्याचे काम सुरू आहे. चार वर्षांपासून हा ट्रेंड सुरू झाला असून, त्याला मागणीही मोठी आहे.