Travel: हिवाळ्यात फिरण्यासाठी कोकणातील 'हे' आहेत सर्वात सुंदर समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्याचा घ्या मनमुराद आनंद!

Travel: हिवाळ्यात कोकणातील समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य अनुभवण्याची मजा काही औरच असते. निळाशार समुद्र, पांढरीशुभ्र वाळू, नारळाची झाडे आणि सुंदर सूर्यास्त पर्यटकांना आकर्षित करतात. तारकर्ली, दिवेआगर, काशीद, हरिहरेश्वर यांसह कोकणातील ६ निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची माहिती जाणून घ्या आणि हिवाळ्यात तुमच्या सहलीचे नियोजन करा.
These are the most beautiful beaches in Konkan to visit during winter(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
These are the most beautiful beaches in Konkan to visit during winter(फोटो सौजन्य - सोशल मीडिया) These are the most beautiful beaches in Konkan to visit during winter(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • तारकर्ली बीच स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग आणि स्वच्छ निळ्याशार समुद्रासाठी प्रसिद्ध आहे.

  • दिवेआगर, काशीद आणि हरिहरेश्वर समुद्रकिनारे निसर्गसौंदर्य, शांत वातावरण आणि धार्मिक पर्यटनासाठी लोकप्रिय आहेत.

  • वेळणेश्वर आणि आरे-वारे बीचवर नारळाच्या बागा, सुंदर सूर्यास्त आणि निवांत वातावरणाचा आनंद घेता येतो.

हिवाळा सुरू झालाकी अनेकांना फिरण्याचे वेध लागतात.त्यातील काही जणांना समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचे वेड असते. थंड आणि आल्हाददायक वातावरणामुळे या दिवसांत पर्यटनाचा आनंद अधिकच वाढतो.तसेच थंडी धुके देखील पडते ज्याने फिरताना अजूनच सुंदर दृश्य दिसतात. विशेषतः कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम मानला जातो.कोकणांत पावसाळ्यात जेवढी मजा येते तितकीच हिवाळ्यात देखील अजूनच सुंदर वातावरं असते. अथांग निळाशार समुद्र, पांढरीशुभ्र वाळू, नारळ-सुपारीच्या बागा आणि मनमोहक सूर्यास्त यामुळे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात. तुम्हीही हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर कोकणातील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्यांना नक्की भेट द्या.

१. तारकर्ली बीच

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्रकिनारा आपल्या स्वच्छ आणि नितळ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग आणि बोटिंग यांसारख्या जलक्रीडांचा आनंद घेता येतो.हा समुद्रकिनारा इथे करता येणाऱ्या विविध कृतींसाठी प्रसिद्ध आहे.त्याचबरोबर स्वच्छ समुद्र हे त्याचे आकर्षण आहे. समुद्राखालील रंगीबेरंगी सागरी जीवसृष्टी पाहण्याची संधीही पर्यटकांना मिळते.

२. दिवेआगर बीच

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारा शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखला जातो. येथील विस्तीर्ण वाळूचा किनारा, नारळाची झाडे आणि समुद्राच्या लाटा पर्यटकांचे मन प्रसन्न करतात. गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.तुम्हाला शांत किनारा निवडायचा असेल तर हा निवडू शकता. कोणत्याही प्रकारच्या गर्दीचा भाग व्हावा लागणार नाही. त्याचा बरोबर सुंदर आणि निसर्गरम्य असा समुद्र किनारा आहे.

३. काशीद बीच

रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारा पांढऱ्याशुभ्र वाळू आणि निळ्याशार समुद्रासाठी प्रसिद्ध आहे. येथील सुंदर किनारा, हिरवीगार झाडे आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. फोटोग्राफी, समुद्रकिनारी फेरफटका आणि मित्र-परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी हे खास ठिकाण आहे. रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारा कोकणातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. पांढऱ्याशुभ्र वाळू, निळेशार समुद्राचे पाणी आणि किनाऱ्यालगत असलेली हिरवीगार झाडे यामुळे या ठिकाणाचे सौंदर्य अधिकच खुलते. मुंबई आणि पुण्याहून वीकेंडला फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते. काशीद बीचवर समुद्रकिनारी फेरफटका मारणे, सुंदर फोटो काढणे आणि सूर्यास्ताचा आनंद घेणे हा एक वेगळाच अनुभव असतो. येथे काही ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेता येतो.

४. हरिहरेश्वर बीच

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारा धार्मिक आणि निसर्गपर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. येथे असलेले प्रसिद्ध हरिहरेश्वर मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या परिसरात समुद्र, डोंगर आणि हिरवाई यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. येथील समुद्रकिनाऱ्यावर काळसर खडक, वाळूचा किनारा आणि उसळणाऱ्या लाटा असे वेगवेगळे निसर्गदृश्य अनुभवता येतात. कुटुंबीयांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदक्षिणा मार्गावरूनही निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो. मात्र खडकाळ भागात चालताना आणि भरतीच्या वेळी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

५. वेळणेश्वर बीच

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात असलेला वेळणेश्वर समुद्रकिनारा शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखला जातो. येथील स्वच्छ वाळू, नारळाची उंच झाडे आणि निळाशार समुद्र पर्यटकांना आकर्षित करतात. इतर लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत येथे तुलनेने शांत वातावरण अनुभवता येते. त्यामुळे शहरातील धावपळीपासून दूर काही दिवस निवांत घालवण्यासाठी हे उत्तम पर्यटनस्थळ आहे. वेळणेश्वर येथील प्रसिद्ध शिवमंदिरालाही पर्यटक आणि भाविक भेट देतात. समुद्रकिनाऱ्यावर सकाळी फिरणे, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकणे आणि संध्याकाळी सूर्यास्त पाहणे यामुळे सहलीचा आनंद द्विगुणित होतो. येथे भेट देताना स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येतो.

६. आरे-वारे बीच

रत्नागिरीजवळील आरे-वारे समुद्रकिनारा आपल्या अप्रतिम निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्राला लागून जाणारा वळणावळणाचा रस्ता, हिरवीगार डोंगररांग आणि अथांग समुद्राचे दृश्य पर्यटकांना भुरळ घालते. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते.रत्नागिरी जिल्ह्यातील आरे-वारे समुद्रकिनारा आपल्या अप्रतिम निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आरे आणि वारे असे दोन किनारे या परिसरात आहेत. या दोन्ही किनाऱ्यांना जोडणारा वळणावळणाचा समुद्रकिनारी रस्ता हे येथील प्रमुख आकर्षण आहे. एका बाजूला अथांग निळाशार समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार डोंगररांग असे मनमोहक दृश्य येथे पाहायला मिळते. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षक आहे. सकाळच्या वेळी समुद्राचे सुंदर दृश्य पाहता येते, तर संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या किरणांमुळे संपूर्ण परिसराचे सौंदर्य खुलून दिसते.

हिवाळ्यात कोकण सहलीचा आनंद घ्या!

हिवाळ्यात कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना भेट देणे हा नक्कीच अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. मात्र समुद्रात उतरताना सुरक्षिततेची काळजी घ्या. भरती-ओहोटीची माहिती घ्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. निसर्गाचा आनंद घेताना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही पार पाडा.