
कढीपत्ता (curry leaves) हा मसाल्यांच्या पदार्थामध्ये येतो. भारतामध्ये उगवणारी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. कढीपत्त्याच्या पानांमध्ये antioxidant (ॲंटिऑक्सिडन्ट), ॲंटि-डायबेटिक (anti-diabetic), ॲंटिमायक्रोबियल (antimicrobial), ॲंन्टि-इन्फ्लेमेटरी हे सर्व गुणधर्म आढळून येतात. दक्षिण भारतात जेवणाच्या पदार्थांमध्ये मुख्यता कढीपत्त्याच्या जास्त वापर केला जातो. यामुळे जेवणाची चव तर वाढते आणि पदार्थाचा सुगंध कायम राहतो. कढीपत्ता चवीला तुरट आणि काही प्रमाणात कडू असतो. कढीपत्त्याच्या मुळांचा रस पिल्याने मुत्रविरोध दूर होतो. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने बरेच फायदे होतात.रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात हे जाणून घेऊया सविस्तर..
सकाळच्या आजारांपासून आराम
सकाळी उठल्यानंतर अनेकांना अशक्तपणा, चक्कर येणे, उलट्या होणे यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही सकाळी उठल्यानंतर २ ते ३ कढीपत्याची पाने रिकाम्या पोटी खाऊ शकता. यामुळे तुम्हाला सकाळी जाणवणाऱ्या अशक्तपणापासून आराम मिळतो.
पचनक्रिया निरोगी ठेवा
सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाने चघळल्यानंतर पचनक्रिया उत्तम राहते. सकाळी कोणताही पदार्थ न खाता कढीपत्त्याची पाने सेवन केल्याने पाचक एन्झाईम्स उत्तेजित होतात आणि आतड्याची हालचाल सुलभ राहते. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून मिळू शकतो.
वजन कमी करणे
वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याची पाने फायदेशीर ठरतात. सकाळी उठल्यावर कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन चांगले होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्ही वाढत्या वजनामुळे त्रस्त असला तर तुम्ही कढीपत्त्याची पाने फायदेशीर ठरू शकते.
केसांसाठी कढीपत्ता फायदेशीर
कढीपत्त्याची पाने केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कढीपत्ता केसगळतीवर परिणामकारक आहे. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम एक ग्लास पाणी प्यावे. त्यानंतर तुम्ही २ ते ३ कढीपत्याची ताजी पाने चावू शकता. पाने व्यवस्थित चावा आणि नाश्ता करण्यापूर्वी किमान 30 मिनिटे थांबा. यामुळे केसांसंबंधित अनेक फायदे होतात. केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याचे तेल बनवून केसांना तुम्ही लावू शकता.