Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर समस्या, आरोग्याचे होईल नुकसान

रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला विश्रांती देण्यासाठी योग्य वेळी झोपणे आवश्यक आहे. रात्री उशिरा झोपल्यामुळे आरोग्यासंबंधित या गंभीर समस्या उद्भवू लागतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2024 | 10:30 AM
रात्री उशिरा झोपल्यामुळे उद्भवू शकतात हे गंभीर आजार

रात्री उशिरा झोपल्यामुळे उद्भवू शकतात हे गंभीर आजार

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी शरीराला झोपेची आवश्कयता असते. दिवसभर थकून घरी आल्यानंतर विश्रांती घेणे आवश्यक आहे. पण असे न करता रात्रीच्या वेळी अनेक लोक खूप उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. याचा नकरात्मक परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी लवकर झोपून सकाळी लवकर उठावे, ज्यामुळे बिघडलेले आरोग्य सुधारण्यास मदत होते. आहरासोबतच योग्य ती झोप घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे रात्री लवकर झोपवावे आणि सकाळी लवकर उठावे. पण हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर शारीरिक आणि मानसिक अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य-istock)

लाइफस्टाईलच्या बातमीसाठी इथे क्लिक करा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा झोपल्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. धावपळीची जीवनशैली, बदलेलं वातावरण, कामाचा तणाव, कुटुंबिक तणाव डिजिटल स्क्रीनचा अतिवापर इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडू लागले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी मोबाईलचा अतिवापर करण्याऐवजी योग्य वेळेत झोपणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या गंभीर समस्या उद्भवतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

रात्री उशिरा झोपल्यामुळे उद्भवू शकतात हे गंभीर आजार:

चयापचय समस्या:

रात्री उशिरा झोपल्यामुळे मेटाबॉलिजमवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच शरीरातील चरबीची पातळी वाढू लागते. चयापचय कमी झाल्यामुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढू लागते. लठ्ठपणाचा धोका वाढतो. वजन वाढल्यानंतर मधुमेह, हृदयविकार आणि पचनासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

मानसिक तणाव वाढतो:

चुकीच्या वेळी झोपल्यामुळे अनेकदा झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे रात्री लवकर झोपावे. उशिरा झोपल्यामुळे मूड स्विंग, नैराश्य आणि चिंता यांसारख्या अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे. मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर सेरोटोनिन आणि डोपामाइन यांसारखे हार्मोन्स असंतुलित होतात. ज्यामुळे चिंता आणि तणाव वाढू शकतो.

मधुमेहाची समस्या उद्भवते:

रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहत जाग राहिल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शरीरामध्ये झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर स्ट्रेस हॉर्मोन वाढू लागतो, ज्यामुळे हृदयावर दबाव येतो. हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित कोणतेही आजार होण्याची शक्यता असते. शिवाय रक्तातील साखरेची पातळी वाढून मधुमेह होऊ शकतो.

लाइफस्टाईलच्या बातमीसाठी इथे क्लिक करा

ब्लड शुगर वाढणे:

रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहणे कठीण होऊन जाते. ज्यामुळे अनेकदा रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात झोप घ्यावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: These serious diseases can be caused by sleeping late at night late night sleep side effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 10:30 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.