Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने करा योग्य ते उपचार

शरीरात वाढलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता असते.रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये लक्षणे दिसू लागतात.जाणून घ्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये दिसणार लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2025 | 08:44 AM
शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे

शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Follow Us:

चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेले तणाव, अतितिखट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन, धूम्रपान, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांसह संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्यांना अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात किंवा आरोग्यामध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता शरीराला पचन होणाऱ्या हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला कोणतेही हानी पोहचत नाही. शरीराच्या रक्तवाहिन्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करतात.(फोटो सौजन्य – iStock)

कायम दीर्घयुषी राहण्यासाठी शरीरातील ‘या’ अवयवांना नियमित करा मालिश, वाढत्या वयात सुद्धा नेहमीच दिसाल तरुण

मानवी शरीरात असलेल्या रक्तवाहिन्या ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे शरीराच्या प्रमुख अवयवांकडे पोहचवण्याचे काम करतात. मात्र शरीरात वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे बऱ्याचदा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पायांमध्ये गंभीर लक्षणे दिसून येतात. पायांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.

रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीराच्या कार्यात आणि रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरात निर्माण होणाऱ्या या अडथळ्यांमुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन जातात. याशिवाय शरीरात मोठे बदल दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे:

  • चालताना अचानक पाय दुखणे
  • पायांमध्ये सतत क्रॅम्प्स येणे
  • पाय सुन्न होणे
  • बोटांवरील जखमा
  • नखांची वाढ न होणे
  • नखांवरील चमक कमी होणे
शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी नियमित करा ‘या’ फळाचे सेवन! हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉलचा धोका होईल कायमचा कमी

नसा ब्लॉक होण्याची कारणे?

शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये आणि इतर भागांमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात होते. पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा झाल्यानंतर रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. धुम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अनियंत्रित रक्तातील साखरेची पातळी इत्यादी गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These serious symptoms appear in the legs after the blood vessels in the body become blocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • Blood clots
  • heart blockage
  • heart care tips

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
1

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

World Heart Day: गोल्डन अवरमध्ये स्टेमी संजीवनी! ५७ लाख ईसीजी तपासण्यांत ३४ हजार रुग्ण ‘स्टेमी क्रिटिकल’
2

World Heart Day: गोल्डन अवरमध्ये स्टेमी संजीवनी! ५७ लाख ईसीजी तपासण्यांत ३४ हजार रुग्ण ‘स्टेमी क्रिटिकल’

World Heart Day: गुडघेदुखीचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

World Heart Day: गुडघेदुखीचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.