कायम दीर्घयुषी राहण्यासाठी शरीरातील 'या' अवयवांना नियमित करा मालिश
निरोगी सर्वच लोक सतत काहींना काही करत असतात. पण हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. चुकीचा आहार, बदलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता योग्य लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी. प्रत्येक व्यक्ती दीर्घायुष्यासाठी सतत काहींना काही करत असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला कायम निरोगी राहण्यासाठी शरीरातील कोणत्या अवयवांना मालिश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
आयुर्वेदामध्ये डोक्याला मालिश करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. याशिवाय आयुर्वेदामध्ये डोक्याला उत्तम अंग असे म्हणतात. त्यामुळे रोज रात्री झोपताना डोक्याच्या मध्यभागी तेलाने मालिश करावे. यामुळे डोके दुखी किंवा डोक्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. शरीरात वाढलेला तणाव दूर करण्यासाठी डोक्याच्या मध्यभागी कोमट तेलाने मालिश करावी. मानसिक तणाव दूर होतो, झोपेची गुणवत्ता सुधारते, मन शांत राहते.
बऱ्याचदा कानाच्या मागे होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतली जातात. पण हे सर्व उपाय करण्याऐवजी नियमित कानाच्या मागे कोमट तेलाने मालिश करावी. कोमट तेलाची मालिश केल्यामुळे मन शांत राहते, मानसिक एकाग्रता वाढते, झोपेची गुणवत्ता सुधारते इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. तणावग्रस्त किंवा अनिद्राग्रस्त व्यक्तींनी नियमित कानाच्या मागे तेलाने मालिश करावी.
नाभीमध्ये तेल लावल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. नियमित रात्री झोपताना नाभीमध्ये तेल टाकल्यास पचनतंत्र, हृदयाचे ठोके आणि मेंदूशी संबंधित क्रिया नियंत्रित राहतात.याशिवाय पोटासंबंधित किंवा पचनसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर नाभीमध्ये तेल टाकावे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
सतत चालल्यामुळे किंवा उंच टाचेच्या चप्पल घातल्यामुळे पाय सतत दुखू लागतात. पायांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी नियमित कोमट तेलाने पायांना मालिश करावे. पायांमध्ये एकूण दोन लाखांपेक्षा जास्त नसा असतात. यामध्ये सहा अतिशय महत्वाचे मर्मबिंदू असतात. पायांमध्ये असलेले हे बिंदू पचन, दृष्टी, रोगप्रतिकारक शक्ती, स्नायूंची ताकद आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आवश्यक ठरतात. पायांना मालिश केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि थकवा लवकर दूर होण्यास मदत होते.