फॅटी लिव्हरमुळे त्वचेवर दिसून येणारे परिणाम
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यातील अनेकांमध्ये प्रामुख्याने जाणवू लागणारी समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. यकृताचे आरोग्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य थांबते. यकृताच्या पेशींमध्ये चरबीचे प्रमाण वाढल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये अतितेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करू नये.
फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर यकृताला सूज येणे, पोटदुखी, भूक न लागणे, थकवा येणे, वजन कमी होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे, जेणेकरून आरोग्य सुधारण्यास मदत होईल. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर योग्य वेळी उपचार मिळाले नाहीतर लिव्हर सिरोसिस, यकृत खराब होणे आणि यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे या स्थितीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरचे त्वचेवर काय परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मधात चुकूनही मिसळू नका 5 पदार्थ, तयार होईल विष आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचा हळूहळू कोरडी होऊन जाते. त्वचेमधील ओलावा पूर्णपणे संपल्यामुळे त्वचा कोरडी आणि रुक्ष होते. त्वचा कोरडी झाल्यानंतर चेहऱ्यावर खाज सुटणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. यकृताचे कार्य बिघडल्यानंतर शरीरात पित्ताची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्वचेसंबंधित ही लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.
अनेकदा चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पुरळ येते. त्वचा लाल आणि कोरडी होऊन जाते. अशी लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. फॅटी लिव्हरमुळे शरीरातील झिंकची पातळी कमी होऊन जाते. शरीराला आवश्यक असलेल्या पोषक घटकांची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते.
हे देखील वाचा: लोहाच्या कमतरतेमुळे काय-काय होऊ शकते?
फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे अनेकदा त्वचा पिवळसर दिसू लागते. त्वचेमध्ये पिवळेपणा वाढतो. त्वचा पिवळी दिसणे हे फॅटी लिव्हरची लक्षणे आहेत. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. फॅटी लिव्हरमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होत जाते. चेहरा आणि डोळ्यांच्या खाली पांढरेपणा वाढू लागतो.