हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसांआधी शरीरात दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे
जगभरात हार्ट अटॅकमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. बऱ्याचदा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात.मात्र शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. विलास उजवणे यांनी मराठी नाट्य, चित्रपट आणि दूरचित्रवाणीमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.(फोटो सौजन्य – iStock)
डॉ विलास उजवणे मागील काही दिवसांपासून ब्रेन स्टोक आणि हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजाराशी लढा देत होते. मात्र या आजारपणात त्यांना अनेक संकटाना सामोरे देखील जावे लागले. हार्ट अटॅक आल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. चुकीचा आहार, जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव, कामाचा तणाव, बिघडलेली मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसांआधी शरीरात कोणते बदल दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात अनेक सामान्य बदल दिसून येतात. मात्र या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते.छातीमध्ये दुखणे किंवा जडपणा जाणवू लागल्यास ऍसिडी झाली असे म्हणून सोडून देतात. मात्र असे न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. कारण हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी छातीमध्ये वेदना होणे, जडपणा वाटणे किंवा अस्वस्थ वाटू लागते. या वेदना बराच काळ टिकून राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अचानक चक्कर येणे, दम लागणे, श्वास घेण्यास अडचणी निर्माण होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागल्यास दुर्लक्ष करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.
हार्ट अटॅक येण्याआधी डाव्या हातामध्ये आणि खांद्यामध्ये वेदना होऊ लागतात. या वेदना खांद्यांपासून सुरु होऊन संपूर्ण हात आणि पायांपर्यंत पोहचू शकते. तर काही वेळा हेच दुखणे पाठ आणि मानेमध्ये पोहचण्याची शक्यता असते.मात्र शरीरात या वेदना अधिकाळ होऊ लागल्यास दुर्लक्ष न करता योग्य ते औषध उपचार करावे. यामुळे हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते.
हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आहारात बदल करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. दैनंदिन आहारात फळे, भाज्या, ड्रायफ्रुटस आणि इतर पौष्टीक घटनांचे सेवन करावे. याशिवाय धूम्रपान किंवा मद्यपान करू नये. नियमित सकाळी उठल्यानंतर २० ते ३० मिनिटं चालण्यास जावे. सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने, प्राणायाम आणि शारीरिक हालचाली कराव्यात.