अबलुटोफोबिया म्हणजे काय?
शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित सकाळी सगळेच अंघोळ करतात. अंघोळ केल्यामुळे शरीर स्वच्छ होते, यासोबतच शरीरावर साचून राहिलेला घाम, उन्हामुळे चिकट झालेली त्वचा स्वच्छ होऊन आरोग्याला अनेक फायदे होतात. काहींना नियमित थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते, तर काहीजण गरम पाण्याची अंघोळ करतात. पण आपल्यातील काहींना अंघोळ करण्याची भीती वाटते. तुम्हाला जर प्रत्येक ऋतूमध्ये अंघोळ करण्याची भीती वाटतं असेल तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. अंघोळ न करणाऱ्या लोकांना अबलुटोफोबिया या फोबियाची लागण होते. अबलुटोफोबिया हा मानसिक आजार असून, हा आजार झाल्यानंतर पाण्याची भयंकर भीती वाटू लागते. अबलुटोफोबिया झाल्यानंतर मानसिक आरोग्य बिघडून जाते.(फोटो सौजन्य – iStock)
रक्तातील साखर होईल कमी ! रोजच्या आहारात करा’ या’ रसाचे सेवन, शरीराला होतील अनेक फायदे
घरातील सर्वच सकाळी उठल्यानंतर नियमित अंघोळ करून शरीर स्वच्छ करतात. मात्र अबलुटोफोबियासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेले लोक अंघोळ करण्यास घाबरू लागतात. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, अमेरिकेमध्ये सुमारे 8 ते 12 % प्रौढांना अबलुटोफोबिया नावाचा गंभीर आजार झाला आहे. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. याशिवाय जीवनशैलीवर वाईट परिणाम दिसून येतो.
अबलुटोफोबिया हा मानसिक आजारांसंबंधित गंभीर आजार आहे. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. ज्यांना नेहमी अंघोळ करताना किंवा पाण्यात गेल्यानंतर त्रास होऊ लागतो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अबलुटोफोबियाचे प्रमाण वाढले आहे. मानसिक आरोग्यासंबंधित गंभीर आजार कोणत्याही व्यक्तीला आणि कोणत्याही वयात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अबलुटोफोबियासारख्या गंभीर आजाराची लक्षणे शरीरात दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अबलुटोफोबियासारख्या मानसिक आजाराची लागण झाल्यानंतर पाण्याची भीती वाटू लागते. अंघोळ करताना अनेक समस्या उद्भवू लागतात. अबलुटोफोबियाने त्रस्त असलेल्या लोकांना अंघोळ करताना अचानक घाम आल्यासारखे वाटणे, हृयद्याचे ठोके वाढणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. ही समस्या प्रामुख्याने लहान असताना पाण्याला घाबरल्यामुळे किंवा पाण्यात होणाऱ्या अपघातांमुळे उद्भवण्याची शक्यता असते.