पालकाची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या आहारात डाळाचाही समावेश करू शकता. निरोगी राहण्यासाठी आपण विविध प्रकारचे पदार्थ खातो. विशेषतः हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्ये आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानली जातात. पण काही लोकांना साधी भाजी, कडधान्ये खायला आवडत नाहीत.
पालकामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात. पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये प्रथिने, कार्ब्स, फायबर, फॅट, कॅलरीज आणि पाणी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय पालक व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि फॉलिक ॲसिडचा चांगला स्रोत आहे. पालक अन्न पचण्यास मदत करते. डाळ आणि पालक भाज्यांमध्ये पाणी, फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर अन्न पचवण्यास मदत करते, तसेच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट निरोगी ठेवते. डाळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता देखील दूर होते.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये पालकही एक आहे. पालकामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते.