Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ वनस्पतीचा आरोग्यासाठी होतो उपयोग! जाणून घ्या फायदे

इसबगोल हे युनानी द्रव्य आहे. इसबगोल हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ घोड्याचे कान असा होतो. याचे उत्पत्ती स्थान इराण आहे. परंतू आता भारतामध्ये गुजरात, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात इंदोर इ. ठिकाणी याची लागवड होते. इसबगोल साधारण तीन फूट उंच वाढते. या वनस्पतीला गव्हासारख्या ओंब्या येतात. त्यामध्ये इसबगोलाच्या बिया असतात. इसबगोलामध्ये सफेद, तांबडे व काळे असे तीन प्रकार असतात. त्यातील औषधांमध्ये सफेद श्रेष्ठ असते तर काळे रंगाचे औषधांत वापरत नाही.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 25, 2022 | 11:49 AM
‘या’ वनस्पतीचा आरोग्यासाठी होतो उपयोग! जाणून घ्या फायदे
Follow Us
Close
Follow Us:

इसबगोल या वनस्पतीला खोड जवळजवळ नसतेच.मात्र तिला दाट आणि मऊ मऊ केस असतात.पाने अत्यंत अरुंद असतात. फुले अत्यंत लहान अंडाकृती आणि पोकळ नळी सारखी असतात. फळाच्या वरचा भाग झाकण सारखा उघळतो. याच्या बिया नावे च्या अकरा सारख्या असतात आणि त्यांमध्ये औषधी गुणधर्म असतो. इसबगोल चे मुळ स्थान भारत हेच आहे. प्राचीन काळापासून इसबगोल वनस्पती याचा उपयोग औषधी म्हणून केला जात आहे. इसबगोल शोथानाषक आहे. तसेच पचन संस्थेच्या आणि जनन मुत्र संस्थेच्या श्लेष्म आवरणाच्या विकारांवर उपयोगी आहे.

इसबगोल वनस्पती चे औषधी गुणधर्म:

इसबगोल वनस्पती बियांमधील श्लेष्मल द्रव्यामुळे आणि अल्बुमीन पदार्थामुळे यांना औषधी गुणधर्म प्राप्त झाला आहे. बिया शामक आणि सारक आहे. तसेच त्या मुत्राल आहे. या त्वचेला थंडावा देणाऱ्या आहेत. इसबगोल वनस्पती पावडर बियांच्या वाळलेल्या टरफलांची असते. बिया काधून टरफले वेगळी केली जातात. पावडर आतड्या मधून सहज आणि कुठलाही त्रास न होता पुढे सरकते. म्हणून बियांपेक्षा पावडर घेणे सुलभ ठरते.

इसबगोलात फायबरचे प्रमाण भरपूर असते

इसबगोलामध्ये मधुर, शीत, कफ, पित्त, रक्तातिसार, रक्तपित्त, ज्वरातिसार, प्रमेह, दाह, वीर्यक्षय, ग्राही, वीर्यस्तंभक इ. गुणधर्म असतात.

औषधी उपयोग:-

वीर्यक्षय, दाह, प्रमेह यांवर इसबगोल रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी त्यात खडीसाखर घालून द्यावे.

डोकेदुखीवर इसबगोल निलगिरीच्या पानांत वाटून मस्तकास लेप करावा.

दमारोगात दोन ते तीन ग्रॅम इसबगोल कोमट पाण्यातून सकाळ- संध्या. द्यावे.

रक्त-संग्रहणीवर इसबगोल आणि खडीसाखर चावून खाण्यास द्यावी.

जीर्ण आमातिसार व रक्तातिसार यांवर इसबगोल दोन चमचे दह्यातून दोन वेळेस द्यावे.

पोटात आग पडते, आतड्यांना सूज येते अशा वेळी दहा ग्रॅम इसबगोल थंड पाण्यात भिजत घालून ते फुलल्यावर खाण्यास द्यावे.

कब्जरोगात इसबगोल एक चमचा रात्री झोपताना दुधातून द्यावे.

अर्सेनिक( एक विषारी पदार्थ) मुळे विषार झाल्यास इसबगोल भिजवून त्यात बेदाणा, दही व गुलाबपाणी एकत्र करून द्यावे; म्हणजे विषार कमी होतो.

ज्वरातिसारामध्ये इसबगोलाचा काढा करून द्यावा.

धात-पुष्टतेस इसबगोल दोन भाग, वेलची एक भाग व खडीसाखर तीन भाग रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे.

स्वप्नदोषावर इसबगोल आणि खडीसाखर समप्रमाणात एकत्र करुन त्यातून एक चमचा मिश्रण अर्धा ग्लास दुधातून झोपण्याच्या एक तास अगोदर द्यावे. झोपण्याच्या अगोदर लघवीला जाऊन झोपावे.

लघवीला आग होणे, जळजळ होणे अशावेळी एक ग्लास पाण्यात चार चमचे इसबगोल भिजवून स्वादानुसार खडीसाखर मेळवून पिण्यास द्यावे.

वजन कमी करण्यासाठी जेवणानंतर एक चमचा इसबगोल पाण्यातून द्यावे. यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पोट भरल्याची जाणीव राहते व पुन्हा-पुन्हा खाण्याची इच्छा कमी होते.

मधूमेहात याच्या सेवनाने शुगर लेव्हल नियंत्रीत राहण्यास मदत होते परंतू इसबगोलाच्या अतिसेवनाने रक्तातील शुगरचे प्रमाण कमी होऊ शकते.

गर्भिणी स्रीने इसबगोल खाणे टाळावे.

Web Title: This plant is used for health learn the benefits isabgol benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2022 | 11:49 AM

Topics:  

  • Aarogya Mantra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.