Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राशीभविष्य, १७ मे २०२२; कर्क राशीवाल्यांना आज जुन्या मेहनतीचे फळ मिळेल; जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

  • By Vivek Bhor
Updated On: May 18, 2022 | 03:03 PM
राशीभविष्य, १७ मे २०२२; कर्क राशीवाल्यांना आज जुन्या मेहनतीचे फळ मिळेल; जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य
Follow Us
Close
Follow Us:

मेष :

आज आपल्या कामामुळे किंवा इतरांच्या कामाच्या शैलीने दु:खी व्हाल. इच्छेनुसार परिस्थिती अनुकूल नसल्याने मन निराश होईल. दुपारनंतर जुन्या मित्राची भेट होईल. आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो, विक्री होईल पण निधीची आवक अडचणीत येऊ शकते. दिवसाच्या थकव्यामुळे संध्याकाळ आळशी असेल. मानसिक ताण सोडल्यास आरोग्य चांगले असेल.

वृषभ :

आजचा दिवस प्रतिकूल आहे. विचारपूर्वक काम करा. कामात चढ-उतार येतील. एका क्षणात नफा मिळण्याची शक्यता असेल, तर पुढच्या क्षणी तोटा झाल्याने निराशा येऊ शकेल. धनप्राप्ती होण्यासाठी एखाद्याची हाजीहाजी करावी लागेल, त्यानंतरही मिळणारा लाभ हा अल्प प्रमाणात असेल. घरातील वडीलजन सहानुभूती बाळगतील, विशेष मार्गदर्शनही करतील. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. सासरच्यांना फायदा होईल. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम पूर्ण होईल.

मिथुन :

आज मानसिक अस्वस्थतेमुळे चांगल्या-वाईटची जाणं कमी असेल. विचार न करता बोलणे, आज भारी पडू शकते. तुमच्यासाठी मनोरंजन करणार्‍या गोष्टी कुटुंबासाठी किंवा इतर जवळच्या लोकांसाठी दुःखी असू शकतात. काम-धंद्यातून नफा होईल, कठोर परिश्रमही करावे लागतील. नोकरीतील लोक निवांत असतील पण घरगुती कामाच्या बोजामुळे ते याचा आनंद घेऊ शकणार नाहीत. कुटुंब व जवळचे नातेवाईक यांच्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. आरोग्य बिघडू शकते, सावधगिरी बाळगा.

कर्क :

आज तुम्हाला जुन्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवहारात संबंधांतून लाभ शक्यता निर्माण होईल. व्यवसायातून दुपारपर्यंत मुबलक नफा कमविण्यास तुम्ही सक्षम असाल, परंतु आज नव्या कामांमध्ये गुंतवणूक करु नका अन्यथा अडथळा येऊ शकतो. घरगुती कामात व्यस्त असाल. सुखसोयीच्या वस्तूंवर खर्च करावा लागेल. तुम्हाला नात्यातील एखाद्या कार्यक्रमात जावे लागू शकते. कौटुंबिक स्थिती अधिक चांगली होईल. बोलण्यातील आणि वागण्यातील गोडव्याने कोणालाही आकर्षित करू शकता.

सिंह :

अविवाहित लोकांशी संबंध येतील. इतरांचे सहकार्य घेण्यास सक्षम असाल. कौटुंबिक जीवनात मतभेद असतील. नोकरीच्या दिशेने तुम्हाला यश मिळेल. प्रेम जीवनात तुम्हाला भेटवस्तू आणि सन्मान मिळेल. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखून ठेवा. शासन सत्तेचे सहकार्य मिळेल. एखाद्या जुन्या मित्राला भेटून आनंद होईल. धार्मिक क्षेत्रात दान करण्याची संधी मिळेल. आरोग्य सामान्य राहील. कोणतीही मौल्यवान वस्तू हरवण्याची वा चोरी होण्याची शक्यता आहे.

कन्या :

दिवसाचा पहिला भाग हा विशेष नसेल, परंतु दैनंदिन काम सामान्य वेगाने सुरू राहील. कार्यक्षेत्रात विलंब झाल्यामुळे व्यवसायाचा वेग कमी होईल. अद्याप अपूर्ण काम लटकण्याची शक्यता आहे. दुपारनंतर कामात मन लागणार नाही. आवश्यक कार्ये वगळता इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये अधिक रस घ्याल, परंतु कोणालाही विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका, अन्यथा आदर कमी होऊ शकतो. दोन बाजूंच्या सलोख्यामध्ये तुमचा महत्त्वपूर्ण सहभाग असू शकतो.

तूळ :

आज घरातील अडचणीमुळे मन अस्वस्थ होऊ शकते. कुटुंबातील सदस्य तुमची बाजू घेण्यास टाळतील. रिअल इस्टेटशी संबंधित कामे घाईघाईत किंवा भावनेच्या भरात करू नका, अन्यथा नंतर त्रास होऊ शकतो. कार्यक्षेत्रात व्यवसायात सुधारणा झाल्याने दिलासा मिळेल. आरोग्याशी संबंधित तक्रारी त्रासदायक असू शकतात आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पूर्णपणे पालन करां. कार्यालयातील अधिकारी वर्गाशी काही कारणास्तव वादविवाद होऊ शकतात. अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक :

आजचा बहुतेक दिवस शांततेत जाईल, परंतु कौटुंबिक समस्या यादरम्यान त्रास देऊ शकतात. व्यवसायातील मेहनतीचे फळ उशिराने मिळेल, धनलाभासाठी वात बघावी लागेल. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी विनम्रतेने व्यवहार करा, अन्यथा सर्व काम स्वतः करावे लागेल. तुमच्या वागण्यात बदल झाल्याने लोक आश्चर्यचकित होतील. सामाजिक क्षेत्रामधून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. उच्च वर्गातील लोकांशी चांगला परिचय होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केलेले श्रम फायदेशीर ठरतील.

धनु :

या दिवशी अपूर्ण काम पूर्ण करण्याची तुम्हाला घाई होईल. घाईगडबडीत काही कामे बिघडू शकतात, याची काळजी घ्या. दुसऱ्या व्यक्तीवर कामातील आपल्या चुकीचा राग काढल्याने चिडचिड होऊ शकते, तरीही बहुतेक काम ठराविक वेळेच्या थोडेफार पुढेमागे पूर्ण केले जाईल. संध्याकाळी धनलाभाची इच्छा पूर्ण होईल. धार्मिक कार्यात विशेष रस घ्याल. कौटुंबिक वातावरण मध्यम असेल.

मकर :

आजूबाजूचे वातावरण अनुकूल असल्याने दिनचर्या व्यवस्थित पूर्ण होईल घरातील व कार्यस्थळातील कामाप्रती गंभीर असाल, वेळेपूर्वी अपूर्ण कामे पूर्ण कराल परंतु पैशाची किंवा अन्य फायद्यांसाठी प्रतीक्षा करावी लागेल. कौशल्यांचे कार्यक्षेत्रात कौतुक केले जाईल. दुपारी दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्यात किंवा कामाच्या थकव्यामुळे स्वभावात त्रास होऊ शकतो. लोकांकडून काम मिळवण्यासाठी तुम्हाला चांगले काम करावे लागू शकते. घरगुती जीवन सामान्यपणे चालू राहील.

कुंभ :

आज तुम्हाला प्रतिकूल परिणाम मिळेल. सकाळपासूनच काम करण्यात शारीरिक आणि मानसिक असमर्थता दिसून येईल. एकाच वेळी दोन विषयांत मन भरकटल्यामुळे गोंधळाची स्थिती असेल. वारंवार प्रयत्न केल्यानंतर निराशा हाती आल्याने कंटाळा येईल. घरी किंवा घराबाहेर मोठेपणामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. रोजीरोटीच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न फलदायी ठरतील. जरी धार्मिक कार्यात श्रद्धा असली तरीही, उपासनेच्या वेळी, मन विचलित होईल. आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका.

मीन :

आजचा दिवस धावपळीचा असेल. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा आणि सुरक्षेची काळजी घेऊन घर सोडा. हेराफेरीच्या धोरणाने पैशांशी संबंधित काम पूर्ण करू शकता. विद्यार्थी दुपारपर्यंत अभ्यासासाठी गंभीर असतील, त्यानंतर चंचलता निर्माण होईल. अधिनस्थ कर्मचारी किंवा नातेवाईकांमुळे ताणतणाव निर्माण होऊ शकतो. घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी थोडीशी चूक झाल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावधगिरी बाळगा. घरगुती आनंद मिळण्यापूर्वी काही कडू अनुभवही येतील.

Web Title: Todays daily horoscope may 17 2022 cancer today will reap the fruits of old hard work read marathi horoscope for today nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2022 | 03:03 PM

Topics:  

  • daily horoscope
  • todays daily horoscope

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.