Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tulsi Vivah: 100 आजारांवर एकमेव रामबाण उपाय आहे तुळस, कोलेस्ट्रॉलचा करेल खात्मा

Tulsi Leaves Benefits: हिंदू धर्मात तुळशीची वनस्पती अत्यंत पवित्र मानले असून आयुर्वेदात तिला महत्त्वाचे स्थान आहे. तुळशीचा वापर केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 12, 2024 | 05:30 PM
तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

Follow Us
Close
Follow Us:

देव उथनी एकादशी आणि तुळशीचे लग्न हा सण आज भारतात साजरा केला जात आहे. तुळशीचे लग्न हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी ज्याला देव उथनी एकादशी असेही म्हणतात यादिवशी साजरा केला जातो. हा सण भगवान विष्णू आणि देवी तुळशीचा विवाह म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी तुळशीच्या रोपाला वधूप्रमाणे सजवून भगवान विष्णूशी लग्न केले जाते. देवी तुळशीचे हृदय इतके शुद्ध होते आणि तिचे चरित्र इतके निष्ठावान होते की भगवान विष्णूने स्वतः तिच्याशी लग्न केले. हा हिंदू विवाहाचा प्रारंभ मानला जातो आणि या दिवसापासून विवाहासाठी शुभ मुहूर्त सुरू होतो.

आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, भगवान विष्णूने पवित्र तुळशीशी लग्न केल्यापासून ते एकमेकांपासून वेगळे झालेले नाहीत. असे मानले जाते की आपण पवित्र तुळशीला जी प्रार्थना करतो ती भगवान नारायणापर्यंत पोहोचते. याच तुळशीच्या लग्नाचे महत्त्व लक्षात घेऊन तुळशीचा आरोग्यासाठी कसा उपयोग होतो हेदेखील त्यांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

कोलेस्ट्रॉलचा करते नाश

तुळस एक उत्कृष्ट अँटीव्हायरल आणि अँटी-कोलेस्टेरॉल औषधी वनस्पती आहे, जी तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि हृदयाचा चांगला मित्र ठरते. तुळशीचा आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून तुळस तुमचे हृदय अधिक निरोगी राखण्यास मदत करते असे आयुर्वेदिक डॉ. दीक्षा भावसार यांनी आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओत सांगितले. 

हेदेखील वाचा – गणपतीच्या पूजेदरम्यान दुर्वा वाहिलेली चालते तुळस का वाहत नाही? जाणून घ्या पौराणिक कारण

तणाव होतो झटकन कमी 

तुळशीचा वापर केल्याने तणाव होतो कमी

तुळस एक उत्कृष्ट साधन आहे जे तुमचा तणाव त्वरीत कमी करते आहे. त्यामुळे मन शांत होण्यास मदत होते. आधुनिक युगात, रेडिओथेरपीचे परिणाम कमी करण्याच्या क्षमतेमुळे ते संशोधनातही सामील आहे. तुम्ही नियमित तुळशीच्या पानाचे सेवन केले अथवा पाण्यातून तुम्ही तुळशीच्या पानाचे सेवन केले वा ते पाणी पिण्यानेही तुमच्या मनावरील ताणतणाव कमी झालेला दिसून येईल. 

प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत 

तुळशीचा चहा कसा करावा

आयुर्वेद डॉक्टरांच्या मते, तुळशीचा चहा प्या किंवा दररोज 4-5 तुळशीची पाने तुमच्या हर्बल चहामध्ये घाला, यामुळे तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहण्यास मदत मिळते. तुळशीचा चहा बनविण्यासाठी 5 तुळशीची पाने घ्या, त्यात थोडे आले किसून घ्या आणि 250 मिली पाण्यात 3-5 मिनिटे उकळा. नंतर गाळून गरमागरम प्या. इच्छा असल्यास, आपण चहामध्ये मधदेखील घालू शकता मात्र चहा थंड झाल्यावरच मध घाला आणि मग प्या. 

हेदेखील वाचा – स्वयंपाकघरात तुळस लावणे शुभ की अशुभ ते जाणून घ्या

तुळशीची पाने की चहा  

तुळशीची पाने चघळण्यापेक्षा चहा पिणे चांगले आहे, कारण तुळशीच्या पानांमध्ये पारा असतो, जो दातांसाठी चांगला नाही. हे चघळल्यावर तुळशीचा पारा तोंडात सोडला जातो, ज्यामुळे दातांना नुकसान होते आणि त्यांचा रंग खराब होतो. पण तुम्ही प्रमाणात तुळशीची पाने खाल्ली तर नक्कीच त्याचा फायदा आहे. 

डॉ. दीक्षा भावसार यांनी सांगितले महत्त्व

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Tulsi vivah special how to use tulsi leaves home remedies to reduce bad cholesterol explained by ayurvedic doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 05:29 PM

Topics:  

  • tulsi benefits
  • Tulsi Vivah

संबंधित बातम्या

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित करा तुळशीच्या चहाचे सेवन, कोलेस्ट्रॉपासून आरोग्यासंबंधित समस्या होतील दूर
1

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित करा तुळशीच्या चहाचे सेवन, कोलेस्ट्रॉपासून आरोग्यासंबंधित समस्या होतील दूर

हिरवीगार तुळशीची पाने आरोग्यासाठी ठरतील वरदान! ‘या’ पद्धतीने करा वापर, झपाट्याने वाढेल रोगप्रतिकारशक्ती
2

हिरवीगार तुळशीची पाने आरोग्यासाठी ठरतील वरदान! ‘या’ पद्धतीने करा वापर, झपाट्याने वाढेल रोगप्रतिकारशक्ती

गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही? भयंकर शापाशी जोडले गेले आहे कारण…
3

गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही? भयंकर शापाशी जोडले गेले आहे कारण…

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ हिरव्या पानांचे करा सेवन, पोट होईल स्लिम
4

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ हिरव्या पानांचे करा सेवन, पोट होईल स्लिम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.