फोटो सौजन्य- istock
हिंदू देवतांना विविध वैशिष्ट्य लाभलेले आहे. सर्व देव हे निसर्गाशी जोडलेले गेले आहेत. शंकराला बेल, कृष्णाला तुळस, विष्णूला कमळ तर गणपतीला दुर्वा प्रिय आहेत, असे म्हटले जाते. गणपती बाप्पाला मोदक, लाडू हे पदार्थ खूप आवडतात. तसेच गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाच लाल फूल वाहतात त्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होत नाही. मात्र हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी तुळस गणपतीला वाहत नाही, ती वर्ज्य मानली जाते. यामागे एक पौराणिक कारण आहे ते जाणून घेऊया.
सगळीकडे बाप्पाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. बाप्पासाठी मखर, नैवेद्य, आरती इत्यादींची तयारी सुरु झाली आहे. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी महत्त्वाच स्थान असतं ते म्हणजे दुर्वा. बाप्पाच्य़ा पूजेच्या वेळी 21 दुर्वांची जुडी वाहण्याची प्रथा आहे. असे म्हणतात की, पुराणात अनालसुराला गिळून गणपतीने देवांची असुरांपासून सुटका केली होती. या असुराला गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यामुळे गणपतीच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्यामुळे त्याला आराम मिळाला. तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याची परंपरा आहे. शिवाय गणपतीला दुर्वा फारच प्रिय आहेत, असे म्हटले जाते.
हेदेखील वाचा- अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला कशी मिळेल शांती, काय सांगते गरुड पुराण
गणपतीला तुळस का वाहत नाही
पौराणिक कथेनुसार, राजा धर्मात्मजची कन्या तुळशी ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की तरुण गणेश गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. पौराणिक कथेनुसार, भगवान तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते. गळ्यात रत्नांची माळ होती. कमरेत रेशमचे पितांबर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते.
हेदेखील वाचा- गणेशोत्सवात गणपती बाप्पाची कोणत्या रंगाची मूर्ती घरी आणावी? जाणून घ्या
गणपतीचे ते सुंदर स्वरुप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे त्यांनी वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला.
हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की, तुझे एक नाही दोन विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की, तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली.
यानंतर, गणेशजी म्हणाले, तू भगवान विष्णू आणि कृष्णाला प्रिय असल्यामुळे कलयुगात तुझी पूजा करणे मोक्षदायक ठरेल. परंतु तुला माझी पूजा करताना अर्पण करणे अशुभ मानले जाईल. तेव्हापासून श्रीगणेशाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले जाऊ लागले.