Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

सूर्याच्या UV किरणांमुळे त्वचा काळवंडते आणि टॅनिंग होते. गुळ, लिंबू, हळद, शॅम्पू आणि टूथपेस्ट यांचा घरगुती उपाय टॅनिंग कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 04, 2026 | 09:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • उन्हामुळे त्वचा काळवंडते आणि नैसर्गिक चमक कमी होते.
  • काही घरगुती घटकांचा योग्य मिलाफ त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो.
  • नियमित काळजी घेतल्यास त्वचा पुन्हा तजेलदार दिसू शकते.
चेहऱ्यावर टॅनिंग होऊ नये म्हणून आपण विविध क्रीम्स आणि लोशन्स वापरतो. मात्र शरीरावर झालेल्या टॅनिंगकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. हात, पाय किंवा मान काळवंडलेली दिसू लागली की आत्मविश्वासही कमी होतो. अशा वेळी महागडे प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करून पाहू शकता. कंटेंट क्रिएटर पूनम देवनानी यांनी सुचवलेला गुळाचा एक साधा उपाय यासाठी उपयोगी ठरू शकतो. हा उपाय कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया.

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’

टॅनिंग का होते?

टॅनिंग ही सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे होते. त्वचा या किरणांच्या संपर्कात आली की शरीरात मेलेनिनचे उत्पादन वाढते. मेलेनिनचे प्रमाण जास्त झाल्याने त्वचा काळवंडते आणि टॅनिंगची समस्या निर्माण होते.

या घरगुती उपायासाठी लागणारी सामग्री

  • १ छोटा तुकडा गूळ
  • लिंबाचा रस
  • थोडे शॅम्पू
  • हळद
  • थोडी टूथपेस्ट
तयार करण्याची पद्धत
  • सर्वप्रथम गूळ बारीक कुटून घ्या आणि थोड्या पाण्यात मिसळून त्याचा द्रव तयार करा.
  • या मिश्रणात ताज्या लिंबाचा रस घाला.
  • एका तव्यावर हळद थोडीशी भाजून घ्या (ती किंचित गडद रंगाची होईपर्यंत).
  • भाजलेली हळद गुळाच्या मिश्रणात मिसळा.
  • त्यानंतर त्यात थोडे शॅम्पू आणि टूथपेस्ट घालून सर्व मिश्रण एकजीव करा.
  • हे तयार मिश्रण टॅनिंग झालेल्या भागावर लावा आणि काही मिनिटे तसेच ठेवा.
    नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.
गुळाचे त्वचेसाठी फायदे

गूळ त्वचेसाठी नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करतो. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात, जे त्वचेवरील घाण आणि मृत पेशी काढण्यास मदत करतात. नियमित वापर केल्यास त्वचा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसू शकते.

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

हळदीचे फायदे

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो. त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हळद त्वचेवरील डाग कमी करण्यास, सूज शांत करण्यास आणि नैसर्गिक उजळपणा देण्यास मदत करू शकते. टॅनिंग कमी करण्यासाठीही ती उपयुक्त ठरते. कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी त्वचेच्या एका छोट्या भागावर पॅच टेस्ट जरूर करा. संवेदनशील त्वचा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरेल. शरीरावरील टॅनिंग कमी करण्यासाठी गुळ, लिंबू, हळद, शॅम्पू आणि टूथपेस्टचा सोपा घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतो. हा नैसर्गिक उपाय त्वचा स्वच्छ करून उजळपणा आणण्यास मदत करतो.

Web Title: Use jaggery to have clean skin and get rid of tanning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.