
वाढत्या वयासोबत आरोग्यासंबंधित समस्यासुद्धा वाढत जातात. त्वचेवर सुरकुत्या पडणं, डाग, वांग येणं यांसारख्या समस्या बऱ्याच महिलांना जाणवतात. त्यामुळे वाढत्या वयासोबत आरोग्याची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. अनेकदा हवामानातील बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो.चेहरा तेलकट होणे, रंग बदलणे,त्वचेवर रेषा दिसू लागणे इत्यादी समस्या उद्भवतात. यामुळे त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारातील महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा घरगुती उपाय केल्याने त्वचा आणखीन उठावदार आणि चमकदार दिसेल.
चेहऱ्यावर डाग आल्यानंतर बऱ्याच वेळा ते आपण कोचतो किंवा फोडतो. यामुळे चेहऱ्यावर त्याचे काळे डाग तसेच पडून राहतात.हे डाग कमी करण्यासाठी मुलतानी माती प्रभावी आहे. मुलतानी मातीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे ब्युटी प्रॉडक्ट बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. यामुळे त्वचेवरील काळेपणा दूर होऊन चेहरा उठावदार दिसेल. त्वचेवरील डाग, पिंपल्स घालवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर कसा करायचा याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
[read_also content=”मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारात नाचणीचे सेवन करावे, आरोग्याला होतील फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/healthy-benefits-of-eating-nachni-541056.html”]
मुलतानी माती,चंदन फेस पॅक:
मुलतानी मातीचा वापर केल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी केला जातो. यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. मुलतानी माती चंदनाचा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा मुलतानी माती मध्ये एक चमचा चंदन पावडर मिक्स करा. त्यानंतर त्यात गुलाबपाणी टाकून घट्ट पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटं ठेवून नंतर मसाज करून धुवून टाका. यामुळे त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत येईल.
[read_also content=”रोज एक चमचा गुलकंद खाल्ल्याने शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-of-eating-gulkand-541658.html”]
मुलतानी माती, हिबिस्कस फेस पॅक:
हिबिस्कसपासून फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये एक चमचा हिबिस्कस पावडर टाकून त्यात एक चमचा मुलतानी माती मिक्स करा. त्यानंतर त्यात ग्लिसरीन टाकून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला १५ ते २० मिनिटं लावून तसंच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.