
कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा काळपट दिसू लागते. तसेच चेहऱ्यावर तेल जमा होण्यास सुरुवात होते. अशा वेळी तुम्ही मुलतानी मातीचा वापर करून चेहऱ्यावरील सुंदरता पुन्हा मिळवू शकता. चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्याने डाग, पिंपल्स निघून जाण्यास मदत होते. मुलतानी मातीपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यासाठी वरदान आहे. मुलतानी मातीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे मुलतानी मातीचा वापर ब्युटी प्रॉडक्ट बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. आज आम्ही तुम्हाला मुलतानी मातीचा वापर करून फेस पॅक कसा तयार करायचा,याबद्दल सांगणार आहोत. यामुळे त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – iStock)
मुलतानी मातीचा वापर अशा पद्धतीने करा:
दूध मुलतानी माती फेसपॅक:
कच्चे दुधाचा वापर त्वचेच्या आरोग्यासाठी केला जातो. त्यामुळे अनेकदा फेस पॅक बनवताना कच्चे दूध वापरले जाते. फेस पॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा मुलतानी माती घेऊन त्यात कच्चे दूध टाकून मिक्स करा. या मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून ठेवा. १५ ते २० मिनिटानंतर फेस पॅक सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील कोरडी त्वचा निघून जाण्यास मदत होईल. तसेच त्वचेमधील पीएच संतुलित राहील.
[read_also content=”शरीराला द्या बर्फासारखा थंडावा, घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये वेलचीचे सरबत https://www.navarashtra.com/lifestyle/make-cardamom-juice-at-home-in-easy-way-545647.html”]
मध मुलतानी माती फेसपॅक:
उन्हाळ्यात चेहऱ्यावर जास्त प्रमाणात तेल तसेच त्वचेवर साठून राहते. त्यामुळे त्वचेची आर्द्रता राखण्यास मदत होते. एका वाटीमध्ये एक चमचा मुलतानी माती घेऊन त्यात मध मिक्स करून चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिट ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाईल आणि चेहरा चमकण्यास मदत होईल.
[read_also content=”नसांमध्ये साचणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय घरगुती ड्रिंक, घाणेरडी चरबी त्वरीत येईल बाहेर https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-lower-ldl-cholesterol-with-homemade-tomato-juice-natural-drink-to-lose-bad-cholesterol-545928.html”]
दही मुलतानी माती फेसपॅक:
चेहऱ्याला दही लावल्यानंतर त्वचेवर चमक येते. दही मुलतानी माती फेस पॅक बनवताना एका वाटीमध्ये १ चमचा मुलतानी माती घेऊन त्यात दही मिक्स करा. या मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटं ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेची चमक वाढेल.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.