'या' पद्धतीने करा चंदनचा वापर
हिवाळ्यानंतर आता उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य आणि त्वचेची जास्त काळजी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये त्वचेची जास्त काळजी घ्यावी. कारण सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक कारणांमुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेला सूट होईल असे योग्य स्किन केअर प्रॉडक्ट वापरावे. उन्हाळ्यात काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळदार करण्यासाठी अनेक महिला त्वचेवर केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा त्वचा उजळदार आणि चमकदार होत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
कमी वयात त्वचा सैल झाली आहे? मग त्वचा घट्ट होण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, चेहरा राहील कायम तरुण
उन्हाळ्यामध्ये त्वचा अतिशय तेलकट होऊन जाते. त्वचेवर साचून राहिलेल्या अतिरिक्त तेलामुळे त्वचेवर पिंपल्स, मुरूम आणि ब्लॅक हेड्स येण्याच्या शक्यता असते. या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर साचून राहिलेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी चंदन पावडरचा वापर कसा करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
मागीलअनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चंदन पावडरचा वापर केला जात आहे. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचा स्वच्छ होते. डीप क्लींजिंग फेसमास्क तयार करण्यासाठी वाटीमध्ये चंदन पावडर आणि मुलतानी माती घेऊन मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात गरजेनुसार गुलाब पाणी टाका. गुलाब पाणी टाकून जाडसर पेस्ट तयार करा. तयार केलेला फेसमास्क चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल. तसेच त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल.
चंदन पावडर त्वचेवर लावल्यामुळे उन्हाळ्यात चेहऱ्यावर साचून राहिलेले अतिरिक्त तेल कमी होते. दैनंदिन वापरत तुम्ही चंदन पावडरचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील तेल नियंत्रणात राहील. टोनर तयार करण्यासाठी १ बाटली पाणी घेऊन त्यात १ चमचा चंदन पावडर मिक्स करा. त्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले टोनर. चंदन टोनरचा नियमित वापरू केल्यास त्वचेवर तेल कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल.
कोरियन ग्लास स्किनचे सिक्रेट! ट्राय करा हे DIY Masks, पहिल्या वापरतच चेहऱ्यावर दिसून येतील बदल
चेहऱ्यावर साचून राहिलेल्या अतिरिक्त तेलामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचा अधिक तेलकट आणि चिकट दिसू लागते. यामुळे चेहऱ्यावर डेड स्किन तयार होऊन चेहरा काळा पडतो. त्वचा काळी झाल्यानंतर ती उजळ्वण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. अशावेळी त्वचेवर स्क्रब करणे आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल. यासाठी चंदन पावडर आणि बेसन एकत्र करून त्यात गुलाब पाणी टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल.