तंबाखू खाऊन लाल भडक झालेले दात स्वच्छ करण्यासाठी 'या' घरगुती पदार्थांचा करा वापर
जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आपल्यातील अनेकांना सतत चहा कॉफी किंवा हानिकारक पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र याच हानिकारक पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह दातांचे सुद्धा आरोग्य बिघडून जाते. तंबाखू, गुटखा, मद्यपान इत्यादी अनेक पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांवर लाल रंगाचा थर किंवा पिवळा थर जमा होऊ लागतो. याशिवाय आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांवर पिवळा थर साचून दात खराब होऊन जातात. त्यामुळे दातांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे आणि पांढऱ्या थरामुळे दात बऱ्याचदा विचित्र दिसू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक कारणामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्यासोबतच दातांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांवर वाढलेला लाल आणि पिवळा थर कायमचा काढून टाकण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दातांवर वाढलेल्या पिवळ्या थरांमुळे दातांचे आरोग्य बिघडून जाते. दात आणि तोंडामधून दुर्गंधीचा वास येऊ लागतो. तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी केळ्याच्या सालीचा वापर करावा. या सालीच्या वापरामुळे दात अतिशय स्वच्छ आणि पांढरे शुभ्र होतात. केळ्याच्या सालीमुळे दातांना पोषण मिळते आणि दात स्वच्छ होतात. दातांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी केळ्याच्या सालींचा वापर करावा. दात स्वच्छ करण्यासाठी केळ्याची साल अतिशय उत्तम पर्याय आहे.
दातांवर साचून राहिलेल्या पिवळेपणामुळे तोंडात दुर्गंधीचा वास येऊ लागतो. तोंडात वाढलेली दुर्गंधी बऱ्याच वेळा आत्मविश्वास कमी करून टाकते. त्यामुळे दातांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. केळ्याची साल दात नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्यासाठी मदत होते. यासाठी केळ्याच्या सालीचा अतिल भाग दातांवर नियमित घासावा. यामुळे दात स्वच्छ आणि पांढरेशुभ्र होण्यास मदत होईल.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप आवडतो. पेरूचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय पेरूची पाने आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. दातांवर वाढलेला पांढरा थर कमी करण्यासाठी पेरूची पाने बारीक करून दातांवर घासा. यामुळे दात स्वच्छ आणि चमकदार होतील. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास दातांवर वाढलेला लालपणा आणि पिवळेपणा कमी होण्यास मदत होईल.